Mouni Roy in temple jewellery : मौनी रॉयची खास टेम्पल ज्वेलरी चर्चेत; पाहा खासियत अन् ज्वेलरीचे एकापेक्षा एक लेटेस्ट पॅटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 05:08 PM2022-01-28T17:08:15+5:302022-01-28T17:44:51+5:30

Mouni Roy in temple jewellery : हे दागिने बनवताना ज्वेलर्सनी मंदिराची वास्तू, इतिहास आणि देवतांच्या सौंदर्यातून प्रेरणा घेतली.

मौनी रॉय (Mauni Roy) आणि सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. दक्षिण भारतीय वधू बनलेली मौनी रॉय या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (Wedding photos of Mauni Roy and Suraj Nambiar) प्रत्येकाला मौनीचा पारंपारिक दक्षिण भारतीय वधूचा लुक आवडला असून तिच्या ड्रेसअपपेक्षा तिच्या दागिन्यांनी (Temple jewellery) सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मौनी रॉयने लग्नात पांढरी, लाल काठांचे कॉम्बिनेशन साडी घातली होती. (Mouni Roy south indian bride) ज्यामध्ये तिने फॅन्सी किंवा आधुनिक दागिन्यांऐवजी टेम्पल ज्वेलरी परिधान केली होती. अनेकांच्या मनात त्यांच्या दागिन्यांबाबत अनेक प्रश्न आहेत. म्हणूनच तुम्हाला टेम्पल ज्वेलरीचा इतिहास आणि खासियत सांगणार आहोत. (Temple jewellery)

टेम्पल ज्वेलरी हे पारंपरिक दागिने मानले जातात. (Mouni roy wedding jewellery) या प्रकारच्या दागिन्यांचा संबंध दक्षिण भारतीय संस्कृतीशी आहे. दक्षिण भारतात, बहुतेक पारंपारिक कार्यांमध्ये हे घालण्यास प्राधान्य दिले जाते. टेम्पल ज्वेलरीजमध्ये मंदिरांच्या भिंती आणि खांबांवर दिसणारी शिल्पे आणि कोरीवकाम साकारलेले असते.

सोनेरी रंगातील ही धार्मिक चिन्हे अधिक शुभ मानली जातात. टेम्पल ज्वेलरीमध्ये हार, बांगड्या, कानातले, अंगठ्या, चोकर नेकलेस आणि कमरबंध डिझाइन केले जाते. काळानुरूप या दागिन्यांमध्ये सुधारणा करून आता ज्वेलरी डिझायनर्सनी स्टोन, डायमंड वर्कसह वेगवेगळे मौल्यवान स्टोन्स वापरण्यास सुरुवात केली आहे.

टेम्पल ज्वेलरीचा उगम चोल आणि पांड्य राजघराण्यात झाला असावा असे म्हटले जाते. सुरुवातीच्या काळात, या प्रकारचे दागिने दक्षिण भारतातील मंदिरांना दिलेल्या मौल्यवान धातूच्या देणग्यांपासून बनवले जात होते आणि देव आणि राजघराण्यांना सुशोभित करण्यासाठी वापरले जात होते. काही वर्षांनंतर मंदिरात भजन आणि नृत्य करणारे कलाकार आणि भाविक या दागिन्यांचा वापर करू लागले.

हे दागिने बनवताना ज्वेलर्सनी मंदिराची वास्तू, इतिहास आणि देवतांच्या सौंदर्यातून प्रेरणा घेतली. त्याकाळी दागिन्यातील कोरीव काम आणि धार्मिक चिन्हे यांच्या माध्यमातून कथाही सांगितल्या जात होत. हे दागिने धार्मिक भावना आणि प्रसंगांशी जोडले गेले आहेत.

टेम्पल ज्वेलरीमध्ये सकारात्मक ऊर्जा असते. हा केवळ दागिन्यांचा तुकडाच नाही तर दक्षिण भारताचा वारसा मानला जातो.

प्रत्येक वेळी तुम्ही ते परिधान करता तेव्हा ते तुमच्या जीवनात दैवी उपस्थितीची भावना निर्माण होते. आजही, नववधूंना त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास दिवसात ही दैवी ऊर्जा जोडायची आहे. लग्नाच्या टेम्पल ज्वेलरीमध्ये सर्वाधिक सोन्याचा वापर केला जातो. यात सोन्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे या दागिन्यांची किंमत हिऱ्यांपेक्षाही जास्त आहे.

आणखी एक प्रमुख अलंकार म्हणजे हिंदू देवतांच्या लहान मूर्ती, सोन्याचे नाणे, फुले, लहान घंटा आणि रुद्राक्षांनी सुशोभित केलेल्या सोन्याच्या माळा.

या हारांव्यतिरिक्त स्त्रिया असा टेम्पल ज्वेलरीला प्राधान्य देतात, ज्यात प्रामुख्याने संपत्तीची देवी श्री लक्ष्मीची मूर्ती असते.(Image Credit- ajio.com)

(Image Credit- Social media)