Navaratri Special: Bollywood actresses beautiful look for Durga Puja
कियारा, काजोल ते हेमामालिनी... बघा दुर्गापुजेसाठी कशा सुंदर नटल्या होत्या बाॅलीवूड अभिनेत्री By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2023 01:50 PM2023-10-23T13:50:00+5:302023-10-23T13:55:32+5:30Join usJoin usNext बंगालमध्ये नवरात्रीच्या दिवसात दुर्गापुजेला अनन्य साधारण महत्त्व असते. त्यातही दुर्गाष्टमीचा दिवस विशेष महत्त्वाचा असतो. म्हणूनच बॉलीवूडच्या अनेक सौंदर्यवती या दिवशी दुर्गापुजेच्या दर्शनाला आवर्जून जातात. बंगाली ब्यूटी सुश्मिता सेन तिच्या दोन्ही मुलींसोबत दुर्गापुजेला गेली होती. त्यावेळी तिने गुलाबी रंगाची सुंदर बांधणी साडी नेसली होती. तिथे तिने हातात धुनी घेऊन पारंपरिक धुनूची नृत्यही केले. काजोलनेही यंदा दुर्गापुजेसाठी चमकदार गुलाबी रंगाची साडी नेसली होती. काजोलही दुर्गापुजा सहसा कधीच चुकवत नाही. काजोलप्रमाणेच बॉलीवूडची बबली गर्ल राणी मुखर्जीही मोठ्या उत्साहात होती. तिने गोल्डन रंगाची सुंदर साडी नेसली होती. तिचं गळ्यातलं आणि चेहऱ्यावरचं मोहक हास्य लक्षवेधी ठरलं. ड्रिम गर्ल हेमामालिनी कन्या इशा देओल हिच्यासोबत दुर्गा पुजेला गेल्या होत्या. यावेळी हेमा यांनी जांभळ्या रंगाची रेशमी पैठणी नेसली होती. तर इशाने सोनेरी रंगाची साडी नेसली होती. 'अनुपमा' फेम रुपाली गांगुली हिची दुर्गापुजेतही उपस्थितीही लक्षवेधी ठरली. टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023फॅशनबॉलिवूडNavratri Mahotsav 2023fashionbollywood