नवरात्री २०२४ : देवाच्या पितळेच्या मुर्ती स्वच्छ करण्यासाठी वापरा 'ही' खास गोष्ट, उजळलेल्या मुर्ती दिसतील सुंदर-प्रसन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2024 09:03 AM2024-10-02T09:03:50+5:302024-10-02T19:00:23+5:30

घटस्थापना करण्यापुर्वी देवघर, देव स्वच्छ केले जातात (cleaning tips for navratri). म्हणूनच तुमचं हे काम सोपं करण्यासाठी या काही खास टिप्स पाहा आणि या पद्धतीने देव स्वच्छ करा.. देवांच्या मुर्ती खूप छान चमकतील आणि देव अतिशय तेजस्वी दिसतील. (how to clean brass god idols at home?)

त्यासाठी सगळ्यात आधी देवाच्या मुर्ती काही मिनिटांसाठी कोमट पाण्यात भिजत ठेवा. (easy tips and tricks to clean brass idols)

त्यानंतर एका भांड्यात २ चमचे सायट्रिक ॲसिड, २ चमचे साखर, १ चमचा पीठ, अर्धा चमचा हळद, १ चमचा मीठ आणि २ चमचे कणिक घ्या. या मिश्रणात पाणी घालून ते कालवून घ्या.

त्यानंतर पाण्यात भिजवून ओलसर झालेल्या देवाच्या मुर्तींना हा लेप लावून ठेवा. त्यानंतर १० ते १२ मिनिटांनी मुर्ती व्यवस्थित घासून घ्या किंवा हातानेच चोळून घ्या.

त्यानंतर पाण्याने मुर्ती धुवून घ्या. मुर्ती अतिशय लख्खं चमकतील...