सलग ९ दिवसांच्या उपवासामुळे ॲसिडीटी वाढण्याची भीती? ७ टिप्स- उपवासाचा त्रास मुळीच होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2024 04:04 PM2024-10-05T16:04:36+5:302024-10-05T16:15:17+5:30

नवरात्रीच्या उपवासामुळे ॲसिडीटी वाढण्याचा त्रास अनेकांना होतो. एनर्जी एकदम कमी झाल्यासारखी वाटते. त्यामुळे खूप गळून गेल्यासारखे होते. म्हणूनच नवरात्रीच्या सलग उपवासांचा त्रास होऊ नये म्हणून खाताना या काही गोष्टींची काळजी घ्या..

उपवास करताना कोणते पदार्थ आवर्जून खावेत, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी dietitian.dnyanada या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की दिवसाची सुरुवात मुठभर सुकामेवा खाऊन करा. यामुळे दिवसभर पुरेल एवढी एनर्जी मिळेल.

त्यानंतर चहा- कॉफी असं काही घेणं टाळा. त्यामुळे ॲसिडीटी वाढते. त्याऐवजी कपभर दुधात एक चमचा गुलकंद टाकून प्या.

नाश्त्यामध्ये राजगिरा किंवा भगरीचे डोसे, भाजणीचे थालिपीठ खा. तसेच नाश्ता झाल्यानंतर थोडेसे लिंबू पाणी प्या. यामुळे व्हिटॅमिन सी पोटात जाऊन एनर्जी मिळेल.

नाश्ता झाल्यानंतर साधारण २ तासांनी एखादे फळ खा.

दुपारच्या जेवणात भगर, राजगिरा, भाजणीचे थालीपीठ यासोबत नवरात्रीच्या उपवासाला चालणाऱ्या भाज्या जास्त प्रमाणात खा.

सायंकाळी चहा घेण्याची खूपच तल्लफ आली तर अगदी अर्धा कप चहा किंवा कॉफी घ्या.सायंकाळी भूक लागल्यास एखादा उकडलेला बटाटा किंवा उकडलेलं रताळं किंवा मग एखादं फळ खा.

रात्रीच्या जेवणात पुन्हा उपवासाचा डोसा किंवा पराठा, भगर असं काही खाण्यावर भर द्या.

त्यानंतर रात्री झोपताना पुन्हा कपभर दुधात गुलकंद टाकून प्यायल्यास ॲसिडीटीचा त्रास होणार नाही.