Navratri- Dussehra special rangoli designs, Simple Rangoli designs for navratri
नवरात्र- दसरा स्पेशल रांगाेळी: रांगोळीतून साकारा देवीचे सुंदर रुप.. साध्या- सोप्या १० डिझाइन्स By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2022 05:31 PM2022-10-03T17:31:40+5:302022-10-03T17:37:47+5:30Join usJoin usNext १. सणावारानुसार रांगोळी काढली की त्या सणाचा कसा छान फिल येऊ लागतो. आजकाल कपड्यांची जशी थीम असते, तशीच सणावाराच्या रांगोळ्यांचीही असते. म्हणूनच या बघा काही नवरात्र- दसरा स्पेशल रांगोळ्या... २. नवरात्र किंवा दसरा याकाळात देवीला खूप जास्त महत्त्व असतं. देवीचाच उत्सव असतो तो. त्यामुळे रांगोळीतूनही अनेक जणी देवीच्या मुर्ती साकारायचा प्रयत्न करतात. ३. यंदा दसऱ्यासाठी तुमचाही देवीचा मुखवटा काढण्याचा किंवा खास नवरात्र- दसरा स्पेशल रांगोळी काढण्याचा विचार असेल, तर या काही खास डिझाइन्स नक्की बघून ठेवा. ४. देवीचा मुखवटा सोप्या पद्धतीने कसा काढता येईल, याचे हे एक छान उदाहरण. पांढरी रांगोळी अणि फुलं अशा मोजक्या साहित्याचा वापर करून ही सुंदर रांगोळी काढली आहे. ५. माहुरच्या रेणुका देवीचा हा मुखवटाही तसाच. एक मध्यम आकाराचा चौकोन काढून घ्या आणि त्यात केशरी रंग भरून नंतर वर दाखविल्याप्रमाणे एकेक आकार काढा. अवघड भासत असली तरी ही रांगोळीही काढायला तशी सोपीच आहे. ६. तुळजा भवानीचं हे रुप अगदी मोहक आहे. रांगोळीतून ते जशाच तसं साकारता येणं हे मोठं कौशल्याचं काम. पण तरी ज्यांना मुळातच रांगोळी, चित्रकला याची आवड आहे, त्यांना ही रांगोळी अगदी सहज जमू शकेल. ७. साधा गेरू रंग किंवा चॉकलेटी, मरून यापैकी कोणताही रंग आणि त्यावर पांढऱ्या रंगाने केलेले हे काम. रांगोळी दिसायला अतिशय सुबक आणि काढायला तेवढीच सोपी आहे. ८. नारळ, नथ, कुंकू आणि साडी.... अशी देवीचे हे प्रतिकात्मक रुपही अतिशय उठून दिसते. ९. ही आणखी एक सगळ्यात सोपी रांगोळी. नथीचा आकार ठसठशीत जमणं ही या रांगाेळीची सगळ्यात महत्त्वाची बाजू आहे. टॅग्स :सोशल व्हायरलरांगोळीनवरात्रीSocial ViralrangoliNavratri