चेहरा गोरा पण मान खूप काळपट? ७ उपाय , चेहऱ्यासह मानही दिसेल ग्लोईंग-सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 05:14 PM2022-12-09T17:14:58+5:302022-12-09T18:17:15+5:30

Neck Tanning Home Remedies : कच्ची पपई घालून त्यात पाणी मिसळून पेस्ट तयार करा. मानेच्या काळपट भागावर ही पेस्ट लावा नंतर ते धुवून घ्या. यामुळे मानेचा काळपटपणा कमी होण्यास मदत होईल.

हिवाळ्याच्या दिवसात चेहरा आणि मानेवरही काळपटपणा जाणवतो. चेहऱ्याच्या त्वचेवर आपण नेहमी लक्ष देऊन असतो पण मानेवरच्या त्वचेकडे दुर्लक्ष झाल्यानं मान काळी पडते. (Skin Care Tips) मान उजळदार दिसावी यासाठी काही सोपे उपाय या लेखात पाहूया. (How to remove tanning from neck)

दह्यात हळद मिक्स करून त्याची पेस्ट बनवून मानेवर लावा थोड्यावेळानं तुम्हाला फरक दिसून येईल.

कच्ची पपई घालून त्यात पाणी मिसळून पेस्ट तयार करा. मानेच्या काळपट भागावर ही पेस्ट लावा नंतर ते धुवून घ्या. यामुळे मानेचा काळपटपणा कमी होण्यास मदत होईल.

दोन चमचे लिंबाच्या रसात मध मिसळून त्याची पेस्ट तयार करा आणि अर्धा तास मानेवर लावा. धुतल्यानंतर तुम्हाला फरक जाणवेल.

बेकिंग सोड्याची पेस्ट तयार करून मानेवर लावा. सुकल्यानंतर पाण्यानं स्वच्छ धुवा यामुळे मान उजळदार दिसण्यास मदत होईल.

काकडीच्या रसात लिंबू मिसळून मानेवर लावा. यामुळे मानेवर फ्रेशनेस जाणवेल

दोन मोठे चमचे अॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळून कॉटन बॉलच्या मदतीनं त्वचेवर लावा आणि नंतर पाण्यानं स्वच्छ धुवा. यामुळे मान उजळदार दिसेल.