एंगेजमेंट रींग एकदम हटके हवी ? पाहा एक से एक पर्याय, तुमची निवड होईल स्पेशल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2022 04:48 PM2022-12-15T16:48:00+5:302022-12-15T18:01:19+5:30

Different Patterns of Engagement Rings : नवरा - बायकोच्या नात्याचं प्रतीक असणारी अंगठी खास असावी यासाठी खास पर्याय.

नवरा - बायको या नवीन नात्याचं प्रतीक म्हणून परिधान केलेली अंगठी ही स्पेशल असावी असं प्रत्येकालाच वाटत. तुम्ही सुद्धा या एंगेजमेंट सीझनमध्ये स्पेशल अंगठीच्या शोधात असाल तर या टिप्स तुमच्या खूप उपयोगी पडतील.(Different Patterns of Engagement Rings).

सध्या गोल्ड बँड्स हा अंगठीचा प्रकार लोकप्रिय होत आहे. यात वधू - वर या दोघांची अंगठी सारखीच असते. फक्त तुम्ही त्या अंगठीवर एकमेकांचं नाव लिहू शकता किंवा दोघांच्याही अंगठीवर एकसारखच डिझाईन करून घेऊ शकता.

जेमस्टोन बँड्स या प्रकारात तुम्ही वेगवगेळ्या ब्राईटस रंगाचे स्टोन तुमच्या अंगठीत बसवून घेऊ शकता. तसेच वधू वराच्या राशीनुसार सुद्धा यात स्टोन बसविता येतात. यात तुमची रिंग ही प्लेन असते तर वरच्या बाजूस रंगीबेरंगी किंवा आवडीनुसार एकाच रंगाचा स्टोन लावला जाऊ शकतो. प्लेन रिंग वरती जेमस्टोन उठून दिसतो.

लग्नसराईमध्ये टेंपल ज्वेलरी एक वेगळाच भाव खाऊन जाते. आतापर्यंत केवळ वधुसाठीच मर्यादित असणारी टेंपल ज्वेलरी आता वरासाठी सुद्धा उपलब्ध आहे. वधूसह वराच्याही टेंपल बँड्सना पसंती मिळते आहे. टेंपल बँड्स मध्ये देव देवता किंवा शुभ चिन्हांचा वापर केला जातो.

डबल टोन मध्ये तुम्ही सोन्यासोबत इतर धातूच कॉम्बिनेशन करू शकता. यामध्ये गोल्ड, व्हाईट गोल्ड, रोज गोल्ड या इतर धातूंचा समावेश असतो.

सध्या हा प्रकार देखील ट्रेंडमध्ये आहे. बेसिक बँड आणि त्यासोबत विविध लेयर्स हे देखील स्टायलिश कॉम्बिनेशन बनू शकतं.

व्हाईट डायमंड्स पासून बनविलेल्या पारंपरिक रिंगला छेद देऊन आजकाल वेगवेगळ्या रंगांचा वापर करून रिंग्स तयार केल्या जातात.

सर्वप्रथम १९ व्या शतकात अ‍ॅक्रोस्टिक ज्वेलरी लोकप्रिय झाली. यातील प्रत्येक एका रत्नाला वर्णमालेचे एक अक्षर दिले होते. जसं की अ‍ॅमेथिस्ट रत्नासाठी - ए , ब्लु टोपाझ रत्नासाठी - बी. त्या काळात एखाद्याला काही गुप्त संदेश द्यायचा असल्यास अश्या प्रकारच्या ज्वेलरी घातल्या जायच्या. त्यामुळे जो कोणी आपल्या पार्टनरला काही गुप्त संदेश देऊ इच्छित असेल त्यांनी अ‍ॅक्रोस्टिक एंगेजमेंट रिंगचा वापर करावा.

जिओमॅट्रिक एंगेजमेंट रिंगमध्ये भौमितिक आकारांचा वापर करून रिंग तयार केली जाते. या रिंगमध्ये असणारे स्टोन आणि अंगठीच्या कडा अगदी क्लीन आणि शार्प असतात. जर तुम्हाला बोल्ड अंदाजात रिंग हवी असेल तर जिओमॅट्रिक एंगेजमेंट रिंग नक्की घ्या.

टॅग्स :खरेदीShopping