net sleeves blouse pattern, 10 attractive designs of net blouse, super stylish net blouse ideas
लग्नसराईसाठी शिवा जाळीदार नेट ब्लाऊज, १० सुंदर पॅटर्न, साध्याच साडीलाही मिळेल स्टायलिश लूक By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2024 04:12 PM2024-11-26T16:12:03+5:302024-11-26T16:19:04+5:30Join usJoin usNext सध्या नेट स्लिव्ह्ज किंवा नेट ब्लाऊज खूप ट्रेण्डिंग आहेत. नेहमीच्या त्याच त्या प्रकारातल्या ब्लाऊजपेक्षा नेट ब्लाऊज जास्त आकर्षक आणि स्टायलिश लूक देतो (net sleeves blouse pattern). परफेक्ट फिटींग असणारं नेट ब्लाऊज असेल तर साधीच साडीही खूप आकर्षक लूक देऊन जाते (10 attractive designs of net blouse). त्यामुळे अशा पद्धतीचं एखादं नेट ब्लाऊज आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवं..(super stylish net blouse ideas) नेट कपड्याच्या अशा मनगटापर्यंत लांब बाह्या असतील तर ते ब्लाऊज खूप सुंदर दिसतं. शिवाय हिवाळ्यातल्या लग्नसराईमध्ये तर थंडीपासून संरक्षण होण्यासाठी ते अधिक आकर्षकही वाटतं. अशा पद्धतीच्या फ्रिलच्या बाह्या असणारं ब्लाऊजही तुम्ही शिवू शकता. दंड बारीक असतील तर अशा पद्धतीचं ब्लाऊज शिवायला हरकत नाही. काठपदराच्या साड्यांवर ब्लाऊज शिवण्यासाठी नेट कपड्याचा अशा पद्धतीने वापर करता येऊ शकतो. नेटच्या बाह्यांवर अशा पद्धतीने वेगवेगळं हॅण्डवर्क करून त्याला आणखी भरीव लूक देता येतो. नेटच्या बाह्यांवर थ्रेडवर्क करण्याचीही खूप फॅशन आहे. स्प्लीट नेट या प्रकारातलं हे एक ब्लाऊज पाहा. बंद गळ्याचं असल्यामुळे आणि कोपऱ्यापर्यंत लांब बाह्या असल्यामुळे हे ब्लाऊज तुम्ही एखाद्या फॉर्मल साडीवरही घालू शकता. अशा पद्धतीच्या पफ बाह्याही नेट ब्लाऊज प्रकारात खूप ट्रेडिंग आहेत. पार्टीवेअर साडीसाठी एकदम स्टायलिश लूक करायचा असेल तर अशा पद्धतीचं आकर्षक ब्लाऊज शिवा. सगळ्यांपेक्षा वेगळ्या दिसाल. कोपऱ्यापर्यंत एकदम घट्ट बाह्या आणि त्यापुढे मग मोठी झालर अशा पद्धतीचं ब्लाऊजही छान दिसतं. संपूर्ण ब्लाऊजवर थ्रेड वर्क असण्याचं हे आणखी एक सुंदर डिझाईन. अशा पद्धतीचं सोबर लूक देणारं आकर्षक ब्लाऊज आपल्या कलेक्शनशमध्ये असायलाच हवं. टॅग्स :फॅशनसाडी नेसणेस्टायलिंग टिप्सfashionsaree drapingStyling Tips