Never Eat Roasted Gram With 5 Foods Milk Curd Citrus Fruits Jaggery
चण्यांसोबत चुकूनही खाऊ नका ५ पदार्थ; तब्येत खराब होईल, करावा लागेल पश्चाताप By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 05:34 PM2024-09-22T17:34:54+5:302024-09-23T17:52:33+5:30Join usJoin usNext Never Eat Roasted Gram With 5 Foods : चणे शेंगदाणे अनेकांना खायला आवडतात. चणे खायला चटपटीत लागत असले तरी चणे खातानाही काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जसं की काही पदार्थ चण्यांसोबत खाणं टाळायला हवं. फुटाणे आणि दूध यांचे एकत्र सेवन केल्यानं पचनक्रियेवर चुकीचा परीणाम होतो. या दोन्ही पदार्थांची प्रकृती वेगवेगळी असते. ज्यामुळे गॅस, एसिडिटी, पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. यासाठी या दोन्ही पदार्थांचे सेवन एकाचवेळी करणं टाळा. दही आणि चणे एकत्र खाल्ल्यानं पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात. दही थंड असते तर चणे गरम असतात ज्यामुळे पोटात असंतुलन निर्माण होते आणि पोट फुलणं, जुलाब यांसारख्या समस्या उद्भवतात. चण्यांबरोबर आंबट फळं जसं की संत्री, लिंबू किंवा इतर सायट्रस फळांचे सेवन करणं तब्येतीसाठी हानीकारक ठरतं. आंबट फळांमधील एसिड आणि चणांमधील प्रोटीनची क्रिया होऊन पोटात जळजळ, एसिडीटीची समस्या उद्भवू शकते. भाजलेले चणे आणि गूळ दोन्ही तब्येतीसाठी चांगले मानले जातात. कारण हे खाल्ल्यानं पोटाच्या इतर समस्या उद्भवत नाहीत. पण हे कॉम्बिनेशन खाल्ल्यामुळे पोटाच्या समस्या गॅस, पोट जड वाटणं उद्भवू शकते. टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यअन्नHealth TipsHealthfood