तुम्हाला घ्यायची का स्वत:च्या नावाची साडी पिन आणि ब्रोच? बघा कस्टमाईज फॅशनचा नवा ट्रेण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2024 15:30 IST2024-04-13T15:23:27+5:302024-04-13T15:30:37+5:30

आजवर साडीला मॅचिंग असणारी साडी पिन तुम्ही घेत आला असाल. पण आता मात्र त्यातही भन्नाट फॅशन आली असून त्या पिनेवर तुमचं किंवा तुम्हाला जे पाहिजे ते नाव लिहून मिळत आहे.

कस्टमाईज साडी पिन आणि ब्रोचचा भन्नाट ट्रेण्ड सध्या सुरू असून अनेक ऑनलाईन शॉपिंग साईटवरही त्या करून मिळत आहेत.

१००- १५० रुपयांपासून अशा पद्धतीच्या साडी पिना किंवा ब्रोच कस्टमाईज करून मिळतात.

त्या वस्तूंना आपला पर्सनल टच राहतो, म्हणून अनेक जण हौशीने ते करून घेतात. सध्या लग्नसराईनिमित्त तर त्याची मागणी खूप वाढली आहे.

अशा पद्धतीचा स्वत:चा फोटो असणारा ब्रोच किंवा साडीपिनही तुम्ही घेऊ शकता. नवऱ्याच्या ब्रोचवर नवरीचा फोटो आणि नवरीच्या ब्रोचवर किंवा साडी पिनवर तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो असं अनेक जण करून घेतात.

नवरदेवासाठी असे काही खास डिझाईन्सही मिळतात.

यामध्ये तुमचं नाव लिहून घ्यायचं आणि त्याखाली अशा पद्धतीच्या मोत्यांचा माळा. ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही हे करून घेऊ शकता.

हे पण एक सुंदर डिझाईन. यामध्ये तुमचं नाव लिहून साडी पिन आणि ब्रोच अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही ते वापरू शकता.