लग्नाच्या सिजनसाठी शिवा नव्या पॅटर्नचे आकर्षक ब्लाऊज; मागच्या गळ्याच्या युनिक १० डिजाईन्स, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 10:32 PM2024-02-18T22:32:57+5:302024-02-18T22:52:26+5:30

New pattern blouses for wedding season : यंदाच्या लग्नसराईत तुमचा लूक खुलवण्यासाठी हे ब्लाऊजचे पॅटर्न मदत करतील.

लग्नसराईच्या दिवसांत नवीन साड्या घेतल्या जातात. या साड्यांवर घालण्यासाठी तुम्ही नवीन पॅटर्नचे ब्लाऊज शिवू शकता. ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे नवनवीन पॅटर्न्स तुमचं सौदर्यं खुलवतील. (Latest Traditional Blouse Designs) पुढच्या गळ्यापेक्षा तुम्ही ब्लाऊजचा मागचा गळा कसा शिवता हे सुद्धा महत्वाचे असते. (Blouse Back Neck Design)

ब्लाऊजचे नवीन पॅटर्न यंदाच्या लग्नसराईत तुमचा लूक खुलवण्यासाठी हे ब्लाऊजचे पॅटर्न मदत करतील. वेगवेगळ्या रंगात किंवा वेगवेगळ्या प्रिंटमध्ये तुम्ही हवंतसं ब्लाऊज शिवू शकता. (Latest Blouse Back Neck Designs)

थ्री-फोर स्लिव्हजमझ्ये किंवा स्लिव्हजलेसमध्ये तुम्ही आपल्या आवडीनुसार ब्लाऊजची निवड करू शकता.

स्टोनचे वर्क केलेले ब्लाऊज शिवण्यासाठी तुम्हाला 3 ते 6 हजार रूपयांपर्यंत खर्च येईल पण त्यामुळे एकमद रिच लूक येतो.

ब्लाऊजमध्ये व्ही नेक, बोट नेट, फ्रिलचे हात किंवा हातांना फुग्यांची फॅशन असलेले ब्लाऊज तुम्ही शिवू शकता.

ब्लाऊजमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या लेस लावू शकता आणि सुंदर डिजाईन्स बनवून घेऊ शकता.

आपल्या पतीचे नाव लिहून नवरी असा शब्द प्रिंट करून घेऊ शकतात. आजकाल पतीचे नाव ब्लाऊजवर लिहायलची फॅशन बरीच ट्रेंडमध्ये आहे.

ब्लाऊजमध्ये तुम्ही मागचा गळा नेटचा शिवू शकता किंवा सुंदर प्रिंटिग बनवू शकतात.

नवीन डिजाईन्सचे ब्लाऊज शिवताना गळ्याची डिजाईन कशी निवडता हे खूप महत्वाचे असते.

मागच्या गळ्यासाठी नेट लावून तुम्ही एक पॅच लावून घेऊ शकता.