रात्री झोपण्यापूर्वी टाचांना लावा 'हे' तेल, सोपा घरगुती उपाय, टाचा होतील मऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2025 11:13 IST2025-04-18T11:10:43+5:302025-04-18T11:13:30+5:30

Night foot care tips: Cracked heel remedies at home: How to get soft feet overnight: Summer foot care routine: टाचांच्या भेगा भरुन काढण्यासाठी आपण रात्री झोपण्यापूर्वी टाचांची काळजी घेतली तर लवकरच त्या बऱ्या होतील.

उन्हाळा सुरु झाला की, आपल्या त्वचेवर त्याचा परिणाम होतो. त्वचा टॅन होते, घामोळ्या येणे, सुरकुत्या येणे यांसारख्या सामान्य समस्या तर असतातच परंतु, टाचांच्या भेगा वाढणं ही समस्या देखील वाढते. (Night foot care tips)

टाचांच्या भेगांकडे आपण फारसे लक्ष देत नाही. ज्यामुळे आपल्याला चालताना त्रास होतो. टाचा कोरड्या पडणे, भेगांमधून रक्त येणे ही समस्या सामान्य वाटतं असली तरी अतिशय वेदनादायी असते. (Cracked heel remedies at home)

टाचांच्या भेगा भरुन काढण्यासाठी आपण रात्री झोपण्यापूर्वी टाचांची काळजी घेतली किंवा त्यांना तेल लावले तर लवकरच त्या बऱ्या होतील. (How to get soft feet overnight)

नारळाचे तेल हे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. भेगा पडलेल्या टाचांना नारळाचे तेल लावा. दिवसातून दोन वेळा हे तेल लावल्याने आपल्याला काही दिवसात आराम मिळेल.

बदामाचे तेल हे फक्त केसांसाठी नाही तर त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. भेगा पडलेल्या टाचांना रोज बदामाचे तेल लावायला हवे. यामध्ये असणारे घटक टाचा भरुन काढण्यास मदत करतात.

फाटलेल्या भेगांना नीट करण्यासाठी रात्री झोपताना मोहरीचे तेल लावा. हे तेल भेगा लवकर भरून काढण्यास मदत करते. यामुळे आपल्याला अधिक फायदा मिळतो.

एरंडीचे तेल हे भेगा भरण्यासाठी आणि त्वचा खडबडीत झाली असेल तर बरी करण्याचे काम करते. रोज झोपण्यापूर्वी हे तेल वापरा, काही दिवसात आराम मिळेल.