घरी केलेल्या नूडल्स चिकटतात, विकतसारख्या मोकळ्या होत नाहीत ७ टिप्स, नूडल्स होतील सुटसुटीत, मोकळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2022 03:26 PM2022-09-02T15:26:35+5:302022-09-02T15:35:07+5:30

१. घरी नूडल्स केल्यावर त्या गचका होतात किंवा खूपच ड्राय होतात, त्यांचं टेक्स्चर विकतच्या नूडल्ससारखं मोकळं, सुटसुटीत नसतं, ही अनेकांची तक्रार असते. म्हणूनच घरी केलेल्या नूडल्सही विकतप्रमाणेच मोकळ्या होण्यासाठी या बघा काही सोप्या टिप्स..

२. नूडल्स करताना या टिप्स ट्राय केल्या तर नक्कीच नूडल्स अधिक मोकळ्या होतील आणि मग चवीलाही आणखी छान लागतील.

३. नूडल्स करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा असा एक पदार्थ आहे, ज्याला तेल थोडं जास्त लागतं. कमी तेलात जर नूडल्स करायला गेलात तर त्या नक्कीच गचका होतात. त्यामुळे कमी तेलात नूडल्स करण्याचा प्रयत्न सहसा करून नका. कारण तो फसण्याचे चान्सेस जास्त आहेत.

४. नूडल्स शिजवून घेण्यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये पाणी उकळत ठेवा. पाणी उकळायला सुरूवात झाली आहे, असं लक्षात येताच त्या पाण्यात १ टीस्पून मीठ, अर्ध्या लिंबाचा रस आणि १ टेबलस्पून तेल टाका. हे प्रमाण नूडल्सच्या एक पॅकेटनुसार आहे.

५. पाणी जेव्हा उकळू लागेल, तेव्हा त्यात नूडल्स टाका.

६. नूडल्स पाण्यात ७० ते ८० टक्केच शिजू द्या. खूप जास्त शिजवलेल्या नूडल्स गचका होऊन जातात.

७. नूडल्सशिजल्यानंतर त्या एका चाळणीत काढा, जेणेकरून त्यातलं गरम पाणी निघून जाईल. त्यानंतर त्यावर थंड पाण्याचा शिपका मारा. सगळ्या नूडल्सला थंड पाणी लागेल, अशा अंदाजाने त्यावर पाणी मारा.

८. त्यानंतर नूडल्सवर तेल टाका आणि ते देखील सगळ्या नूडल्सला व्यवस्थित लागले जातेय ना, याकडे लक्ष द्या.

९. आता नूडल्स करण्यासाठी जी कढई तापायला ठेवाल, ती खूप जास्त कडक तापू देऊ नका. त्याआधीच तिच्यात तेल टाका. आणि ते तेल संपूर्ण कढईला लागल्या जाईल अशा पद्धतीने टाका.

१०. या काही टिप्स वापरून नूडल्स केल्या तर त्या नक्कीच मोकळ्या आणि अधिक सुटसुटीत होतील.