Office Look Outfit Ideas : पावसाळ्यात ऑफिस वेअरसाठी ट्राय करा ट्रेंडी वनपीस; कमी बजेटमधले लेटेस्ट पॅटर्न्स , पाहा एका क्लिकवर By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 04:08 PM 2022-06-29T16:08:50+5:30 2022-06-29T16:50:51+5:30
Office Look Outfit Ideas : जर तुम्हाला सिंगल स्ट्रिप्स वनपीस आवडत असतील तर तुम्ही हे नवीन कलेक्शन ट्राय करू शकता. तर तुमचे आर्म फॅट जास्त असेल तर या ड्रेसमध्ये ते फारसं दिसून येणार नाही ज्या स्त्रिया रोज ऑफिसला जातात त्यांना तेच तेच कुर्ते, जिन्स, पॅन्ट्स, शर्ट्स घालून नेहमीच बोअर होतं. काही नवीन साजेसा ऑफिसवेअर ट्राय करावा असं प्रत्येकीला वाटतं तर काहीजणींना वनपीसची आवड असूनही बजेट कमी असल्यानं विकत घेणं टाळतात. (Office look outfit ideas) काहींना गुघड्यापर्यंत तर काहींना त्यापेक्षा थोडे मोठे असलले वनपीस घालायला आवडतात. (How can I look pretty in office) या लेखात तुम्हाला कमीत कमी बजेटमधले ट्रेंडी वनपीस दाखवणार आहोत. ऑनलाईन शॉपिंग किंवा बाजारातही तुम्ही या प्रकारचे कपडे विकत घेऊ शकता. ५०० ते ८०० रूपर्यांपर्यंत तुम्हाला असा ड्रेस मिळेल. (What clothes to wear in an office) (Image Credit- Myntra)
जर तुम्हाला सिंगल स्ट्रिप्स वनपीस आवडत असतील तर तुम्ही हे नवीन कलेक्शन ट्राय करू शकता. तर तुमचे आर्म फॅट जास्त असेल तर या ड्रेसमध्ये ते फारसं दिसून येणार नाही. यावर तुम्ही ब्लॅक, व्हाईट किंवा कोणतंही डार्क रंगाचं जॅकेट, स्ट्रग वेअर करू शकता. ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर ६०० ते ८०० रूपयांपर्यंत तुम्हाला असे ड्रेस विकत घेता येतील. (Image credit- DressUp Shopee)
जर तुम्हाला कॉटनचा कुर्ती टाईप वनपीस हवा असेल तर हे पॅटर्न नक्क ट्राय करू शकता. गुघड्याच्या खालपर्यंत असलेला हा वनपीस तुम्हाला स्टायलिश लूक देईल. यावर तुम्ही व्हाईट शूज किंवा मोजडी, पावसाळ्याचे शूजही घालू शकता. (Image Credit- Myntra)
सिंगल स्ट्रिपसह ए लाईन वनपीस घालून तुम्ही ऑफिसला घालून गेलात तर तुमचा लूक नेहमी पेक्षा अधिक कॉन्फिडंट दिसेल. या पॅटर्नमध्ये तुमचा नेक बोन (Neck Bone)छान दिसून येईल त्यामुळे फॉर्मल पण तितकाच सुंदर, सेक्सी लूक मिळेल. (Image credit-Centrehara)
थ्री फोर हॅण्ड्स आणि फ्रिलची बॉर्डर असलेला वनपीसही तुम्ही ऑफिसवेअरसाठी ट्राय करू शकता. आजकाल बाजारात अशाप्रकारे वनपीस खूप उपलब्ध आहेत. याचे कापड टिकायलाही चांगले असते. (Image Credit- Direct Gharpe)
जर तुम्हाला क्लोज नेकसह फूल वनपीस ऑफिसवेअरसाठी निवडायचा असेल तर हा पर्याय निवडू शकता. ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर सध्या डिस्काऊंट किमतीत तुम्ही ऑफिसवेअसरसाठी असा ड्रेस खरेदी करू शकता. (Image Credit- Myntra)
साधारण ६०० ते ९०० रूपयांपर्यंत तुम्ही असा वनपीस खरेदी करू शकता. (Image Credit - NykaaFashion)
फ्रॉक टाईप वनपीस तुम्हाला १०० ते १२०० रूपयांपर्यंत मिळतील. ऑफिसमध्ये काही खास पार्टी किंवा वाढदिवस असल्यास तुम्ही असा ड्रेस घालू शकता. (Image Credit- Ville fashions)
५०० ते ८०० रूपयांपर्यंत तुम्हाला असे वनपीस मिळतील. ऑफिसमध्ये सिंपल सोबर लूक हवी असेल तर तुम्ही हे पॅटर्न नक्की ट्राय करू शकता. (Image Credit - Nykaafashion)
जर तुम्ही बारीक शरीरयष्टीचे असाल तर तुम्ही असे वनपीस ऑफिसला घालू शकता. आरामदायक फॅब्रिक आणि सौम्य कलरमुळे तुम्ही या लूकमध्ये उठून दिसाल. ६०० ते ८०० रूपयांपर्यंत तुम्हाला असे वनपीस पाहायला मिळतील. (Image Credit - Cravlyn)