देशासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकणाऱ्या ७ कर्तबगार लेकी, परिस्थितीवर मात करत त्यांनी पाहा कसा रचला इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2024 09:08 AM2024-07-27T09:08:16+5:302024-07-27T17:38:07+5:30

ज्या देशात मुलींनी खेळणंच महत्त्वाचं मानलं जात नाही, त्या देशातल्या या मुलींनी ऑलिम्पिक पदक जिंकत दाखवून दिलं आपण सर्वोत्तम आहोत. आतापर्यंत भारताने ऑलिम्पिकमध्ये ३५ पदकं जिंकली आहेत. त्यापैकी ७ पदकं महिला खेळाडूंनी जिंकून आणली आहेत.

कर्णम मल्लेश्वरी यांनी २००० साली सिडनी ऑलिम्पिकमध्ये भारोत्तोलन खेळात कांस्य पदक पटकावलं आणि इतिहास घडवला. त्या ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पहिला भारतीय महिला खेळाडू ठरल्या.

त्यानंतर खूप मोठी प्रतिक्षा करावी लागली आणि तब्बल १२ वर्षांनी सायना नेहवालच्या रुपात भारताला बॅडमिंटन खेळात दुसरं ऑलिम्पिक कास्यं पदक मिळालं.

त्याचवर्षी म्हणजेच २०१२ मध्येच मेरी काेम यांनीही भारतासाठी कास्यं पदक जिंकलं. ते वर्ष भारताच्या महिला खेळाडूंनी गाजवलं..

यानंतर २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा बॅडमिंटन खेळात भारताचं नाण खणखणलं आणि पी. व्ही. सिंधूने रजत पदक जिंकलं.

कुस्ती हा आपल्याकडचा पुरुषप्रधान खेळ. पण यामध्ये वर्चस्व गाजवत साक्षी मलिक हिने २०१६ च्या स्पर्धेत कास्यं पदक जिंकून भारताची आणि भारतातील सगळ्याच कुस्तीपटूंची मान उंचावली.

यानंतर २०२० मध्ये मीराबाई चानू यांनी भारताला रजत पदक मिळवून दिलं.

२०२० मध्येच कुस्ती खेळात लवलीना बोरगोहांईने कांस्य पदक जिंकलं. २०२० मध्ये भारतीय महिला खेळाडूंनी पदकांची हॅट्रिक केली आणि पी. व्ही. सिंधू हिच्या नावावर आणखी एक कांस्य पदक नोंदवलं गेलं.