जागतिक बालदिनानिमित्त मुलांना शिकवा ७ योगासने, शरीर मजबूत-मेंदू होईल तीक्ष्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2022 06:42 PM2022-11-20T18:42:37+5:302022-11-20T18:57:56+5:30

Universal Children's Day Teach Yoga Poses to Child युनिव्हर्सल चिल्ड्रेन्स डे दरवर्षी २० नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिनानिमित्त मुलांना शिकवा ७ योगासने, बनवा मजबूत

जागतिक बालदिन दरवर्षी २० नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. 1954 पासून जागतिक बालदिन साजरा करण्यास सुरुवात झाली. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश जगभरातील मुलांचे कल्याण आणि जागरूकता वाढवणे हा आहे. 1959 साली, युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने बालहक्कावरील अधिवेशन स्वीकारले. 20 नोव्हेंबर हा बाल हक्कांवरील संयुक्त राष्ट्रांच्या कन्व्हेन्शनचा वर्धापन दिन देखील आहे. त्यामुळेच हा दिवस बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारतात जरी बालदिन 14 नोव्हेंबरला साजरा करण्यात येतो. परंतु, एकेकाळी भारतात 20 नोव्हेंबर हा बालदिन निश्चित करण्यात आला होता. या विशेष दिवशी मुलांच्या चांगल्या विकासासाठी अनेक प्रकारच्या मोहिमा आखल्या जातात. या वर्षी सार्वत्रिक बालदिनाची थीम, "इक्वेलिटी एंड इंक्ल्यूजन, फॉर एव्री चाइल्ड" ही आहे. याचा अर्थ असा की सर्व मुलांना समान रीतीने वाढण्याचा आणि विकसित होण्याचा अधिकार आहे. या विश्व बालदिनानिमित्त आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी कोणती योगासने फायदेशीर आहेत, या संदर्भात माहिती घेऊयात.

वृक्षासन आपल्या मुलांसाठी खूप फायदेशीर आहे. हे आसन नियमित केल्यामुळे मन संतुलित राहते, एकाग्रता वाढते यासह पाठ, हात, कंबर आणि पायांना मजबूत बनवते. हे आसन शरीर आणि मन यांच्यात संतुलन स्थापित करण्यास मदत करते.

मुलांना स्मार्ट बनवण्यासाठी त्यांच्याकडून रोज प्राणायाम करवून घेणे खूप फायदेशीर ठरेल. प्राणायाम केल्याने मुले तणावमुक्त होतात, त्यांना चांगली आणि गाढ झोप लागते. यामुळे मुले अभ्यासात गुंततात आणि त्यांच्या मनाचा चांगला विकासही होतो.

मेंदूला चालना देण्यासाठी मुलांना सुखासन करायला शिकवा. हे आसन केल्याने पुरेशी आणि चांगली झोप मिळते. या आसनाच्या मदतीने मुले तणावमुक्त होतात. यासोबतच त्यांचे पायही मजबूत होतात. जर तुम्हाला तुमच्या मुलांना हुशार बनवायचे असेल तर दररोज या आसनाचा सराव करणे त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल.

दंडासनामध्ये शरीराचा संपूर्ण भार मनगटावर पडतो, त्यामुळे मनगटाची ताकद वाढते. यासोबतच पाठीचा कणाही मजबूत होतो. याशिवाय दंडासन केल्याने मुलांची बसण्याची मुद्रा देखील चांगली होते.

भुजंगासनाला कोब्रा पोझ असेही म्हणतात. भुजंगासन खांदे आणि मानेला खुले करतात. पोटाचे स्नायू मजबूत बनतात, यासह पाठ आणि खांदेही मजबूत बनतात. पाठीच्या वरच्या आणि मधील भागामध्ये रक्त संचार सुधारून त्यांना लवचिक बनवते आणि तेथील तणाव आणि थकवा कमी करते.

पर्वतासान या आसनामुळे पायांच्या स्नायुमध्ये, गुडघ्याच्या मागील नसांमध्ये आणि पाठीतील स्नायुमध्ये ताण निर्माण होतो. थकवा नाहीसा होतो. स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते.

धनुरासन केल्याने पाठ आणि पोटातील स्नायुंना मजबूत बनवते. पाठ लवचिक बनते. तणाव आणि थकव्यापासून मुक्ती मिळते. याने मुलांमध्ये एक ऊर्जा निर्माण होते.