पी.टी उषाच्या नावे आता नवा विक्रम, पहिली महिला ऑलिम्पिक अध्यक्ष होण्याचा मान.. वंडर गर्लची पाहा कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2022 11:38 AM2022-11-29T11:38:50+5:302022-11-29T11:42:35+5:30

P T Usha Created History President of Indian Olympic Association : ९५ वर्षांच्या इतिहासात महिला अध्यक्ष होणाऱ्या पी.टी उषा या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत.

पी.टी उषाच्या नावे आता नवा विक्रम, पहिली महिला ऑलिम्पिक अध्यक्ष होण्याचा मान.. वंडर गर्लची पाहा कामगिरी

भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे प्रमुखपद भूषविणाऱ्या पी.टी उषा या पहिल्याच ऑलिम्पियन आणि आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या खेळाडू आहेत. उषा या सध्या राज्यसभेच्या खासदार असल्याने राजकारणातील अनेक वरिष्ठांनी त्यांचे या निवडीबद्दल अभिनंदन केले.

आपल्या धावण्याने २ दशकं भारतीय आणि आशियायी अॅथलेटीक्स गाजवलेल्या पी.टी उषा यांनी २००० मध्ये खेळातून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्यांनी विविध पदे भूषवली. पण आताचे पद त्यांच्यासाठी आणि भारतीयांसाठीही ऐतिहासिक असेल.

भारतीय ऑलिम्पिक संघासाठी १० डिसेंबर रोजी निवडणुका होणार आहेत. यावेळी अध्यक्ष पदासाठी पी.टी उषा यांनी एकटीनेच अर्ज केलेला असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सांगण्यात आले. रविवारी हा अर्ज करण्याची शेवटची तारीख होती.

इयत्ता चौथीमध्ये असताना पी.टी उषा यांनी धावायला सुरुवात केली आणि वयाच्या १३ व्या वर्षी त्यांची खेळातील कारकिर्द सुरू झाली. प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने एखादी गोष्ट केली की त्याचे फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही हेच उषा यांच्या कामगिरीतून दिसून येते. एकेकाळी कोणालाही माहित नसलेलं हे नाव आज आपल्या कतृत्त्वाने जगभरात प्रसिद्ध आहे.