मुलांची उंची वाढत नाही म्हणून टेन्शन येतं? आहारात करा ६ पदार्थांचा समावेश; उंची वाढेल भरभर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2022 05:36 PM2022-12-27T17:36:21+5:302022-12-27T17:43:27+5:30

Parenting Tips Foods That Can Make Child Taller : मुलांच्या आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास मुलांची उंची वाढण्याची शक्यता असते, याविषयी...

आपला मुलगा किंवा मुलगी उंच नाही म्हणून अनेकदा पालकांना चिंता वाटते. पण आई-वडीलांची उंची जास्त नसेल तर मुलांची उंची फारशी वाढत नाही. इतकेच नाही तर बरेचदा आपण खात असलेल्या अन्नातून पुरेसे पोषण होत नसेल तरी उंची वाढत नाही. अशावेळी मुलांच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केल्यास त्यांची उंची वाढण्यास मदत होईल ते पाहूया (Parenting Tips Foods That Can Make Child Taller).

आहार पोषक हवा असं आपण ऐकतो मात्र अनेकदा आपण जंक फूड खात असल्याने मुलंही तेच खाण्याची मागणी करतात. पण मुलांना वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून आवर्जून पालेभाज्या खायला द्यायला हव्यात. त्यामुळे त्यांची वाढ चांगली होण्यास मदत होते.

दूधाला पूर्णान्न म्हटलं जातं. मात्र मुलं अनेकदा दूध प्यायला कीरकीर करतात. पण दुधात प्रोटीन, कॅल्शियम हे महत्त्वाचे घटक असल्याने मुलांच्या वाढीसाठी दूध अतिशय फायदेशीर असते. त्यामुळे मुलांची हाडे चांगली राहण्यासही मदत होते.

गाजरामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते. हे दोन्ही घटक उंची वाढण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. तसेच रताळ्यामध्येही व्हिटॅमिन ए चे प्रमाण चांगेल असल्याने त्याचा मुलांची उंची वाढण्यात चांगला उपयोग होतो.

बदामासारख्या सुकामेव्यामध्ये बरीच व्हिटॅमिन्स असतात. ज्यामुळे मुलांची उंची वाढण्यास मदत होते. त्याशिवाय बदामामध्ये असणारे हेल्दी फॅटस हृदयाचे कार्य सुरळीत चालावे यासाठीही अतिशय उपयुक्त असतात. याशिवाय सुकामेव्यातील इतरही गोष्टींचा समावेश फायदेशीर ठरतो.

आपल्या आहारात शेंगा प्रकारातील मसूर, राजमा, काळे वाटाणे, मूग, हरभरा अशा विविध शेंगांचा किंवा कडधान्यांचा समावेश असायला हवा. या शेंगांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, फॅटस चांगल्या प्रमाणात असतात. मुलांच्या वाढीसाठी हे सगळे आवश्यक असल्याने आहारात या गोष्टी अवश्य असायला हव्यात.

बरेचदा आपण आहारात पोळी आणि भात या २ गोष्टींचाच प्रामुख्याने समावेश करतो पण मुलांची उंची वाढायची असेल तर आहारात बाजरी, ज्वारी, नाचणी, राळं, राजगिरा अशा विविध प्रकारच्या धान्यांचा समावेश असायला हवा.