रोजच्या वापरासाठी मोत्याचे कानातले घ्यायचे? पाहा कॉलेज-ऑफिसला जाताना घालण्यासाठी ८ नाजूक- सुंदर डिझाईन्स By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2024 02:06 PM 2024-11-09T14:06:53+5:30 2024-11-09T14:36:20+5:30
रोजच्या वापरासाठी किंवा ऑफिसमध्ये घालता येण्यासारखे, तरुण मुलींना कॉलेजमध्ये घालण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतील अशा पद्धतीच्या मोत्याच्या कानातल्यांमध्ये सध्या कित्येक नवनविन प्रकारचे कानातले पाहायला मिळतात.
तुम्हाला तशाच प्रकारच्या कानातल्यांची खरेदी करायची असेल तर या काही पर्यायांचा नक्कीच विचार करू शकता.
हे एक नाजूक सुंदर डिझाईन पाहा. चेहरा थोडा मोठा असेल तर अशा पद्धतीचं कानातलं खूप छान दिसतं.
कॉलेजमधल्या तरुणींना तसेच ऑफिसमध्ये घालण्यासाठी हे एक छान डिझाईन आहे.
ठसठशीत माेती आणि त्याच्या बाजुला नाजूक डिझाईन हा पर्यायही आकर्षक लूक देऊ शकतो.
ऑफिसमध्ये नेहमी सलवार सूट किंवा साडी नेसण्यास प्राधान्य देत असाल तर त्यावर अशा पद्धतीचं थोडं मोठं डिझाईन असणारं कानातलं घालायला हरकत नाही.
मोत्याचं एकदम ट्रेण्डी पद्धतीचं कानातलं घ्यायचं असेल तर अशा प्रकारच्या स्टायलिश कानातल्याची निवड करा.
हे एक नाजूक सुंदर डिझाईन. हे अशा प्रकारचं कानातलं आहे जे शाळकरी मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यंत सगळ्याच वयोगटातल्या महिलांना शोभून दिसेल. शिवाय साडी, जीन्स, सलवार सूट अशा सगळ्याच ड्रेसिंगसाठी ते परफेक्ट मॅच ठरेल.
चेहरा थोडा मोठा असेल आणि नेहमीच थोडे मोठे कानातले घालण्याची सवय असेल तर हे एक नव्या प्रकारचं डिझाईन तुम्हाला आवडू शकतं.