Perfect traditional ethnic makeup look for this wedding season, 10 best makeup looks
Makeup Tips: लग्नाला जाताय, झटपट तयार व्हायचं आहे? बघा 10 परफेक्ट लूक्स, दिसा एकदम खास By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 03:59 PM2022-05-16T15:59:02+5:302022-05-16T16:03:33+5:30Join usJoin usNext १. सध्या लग्नसराई सुरु आहे. लग्नात आपला लूक सगळ्यांपेक्षा काही तरी खास असावा, वेगळा असावा, असं प्रत्येकीला वाटतं.. तुमचा लूक इतरांपेक्षा हटके करायचा असेल तर हे काही स्टायलिश लूक बघा.. २. आकर्षक मेकअप करण्यासाठी खूप काही वेगळं करावं लागत नाही. फक्त आपले कपडे, ॲक्सेसरीज आणि हेअरस्टाईल यांत केलेले छोटेछोटे बदलही तुम्हाला वेगळा लूक देऊ शकतात. आता हेच बघा ना सायली संजीवने टिपिकल इरकल साडीवर घातलेलं स्लिव्हलेस ब्लाऊज आणि ॲक्सेसरील तिचा लूक एकदम बदलून टाकणाऱ्या ठरल्या. ३. रणबीर कपूर- आलिया भट यांच्या मेहंदी कार्यक्रमाला करिश्मा कपूरने केलेल्या या लूकची चांगलीच चर्चा झाली होती. तुम्हीही तिच्यासारखा गेटअप अगदी सहजपणे करू शकता. अनारकली ड्रेस, त्यावर केसांची बन हेअरस्टाईल. कानात मोठे झुमके, मोठी टिकली आणि हातात बांगड्या.. करून बघा असा लूक एकदा. ४. ट्रॅडिशनल लूकला थोडा मॉडर्न टच द्यायचा असेल तर सई ताम्हणकरची ही स्टाईल खासच आहे.. साडी, स्लिव्हलेस ब्लाऊज, मोठे झुमके आणि छोटीशी टीकली.. बस्स एवढंच केलं तरी दिसाल सगळ्यांपेक्षा वेगळे. ५. जवळचं लग्न असेल आणि अगदीच पारंपरिक ड्रेसिंग करणं गरजेचं असेल तर उर्मिलाचा हा लूकही झकास आहे. ६. लेहेंगा घालणार असाल तर हे तिन्ही लूक वेगवेगळे आहेत. यापैकी कोणताही लूक तुम्हाला अगदीच स्पेशल बनवू शकतो. ७. नऊवारी साडी नेसण्याचाही हल्ली ट्रेण्ड आहे. अगदी ठरवून सगळ्या करवल्या नऊवार नेसतात. इतर नऊवारी लूकमध्ये तुम्हाला तुमचं वेगळेपण दाखवायचं असेल, या दोघींच्याही स्टाईल कमाल आहेत. ८. सिंपल एथनिक लूक कसा असावा, याचं हे आणखी एक उदाहरण. कोणत्याही हेवी ॲक्सेसरील न घालता तुम्ही अत्यंत आकर्षक दिसू शकता. फक्त असा लूक करायचा असेल तर तुमचा मेकअप आणि हेअरस्टाईल अगदी परफेक्ट हवी... ९. प्राजक्ता माळीचा हा लूक तिच्या ॲक्सेसरीजमुळे अधिक खुलून आला आहे. त्यामुळेच तर तुमची दागदागिन्यांची चॉईस अगदी परफेक्ट जमून येणं गरजेचं आहे. साध्याच साडीवर मॉडर्न किंवा वेस्टर्न टच असणारे दागिने घातले तरी तुम्ही हटके दिसू शकता. १०. खूप हेवी वर्क असणारे कपडे असतील, तर त्यावर तुम्ही कोणतेही हेवी दागिने, हेअरस्टाईल करण्याची गरज नसते. अशावेळी अशा सोबर ॲक्सेसरीज आणि मेकअप तुम्हाला बॅलेन्स लूक देऊ शकतात. टॅग्स :ब्यूटी टिप्समेकअप टिप्सफॅशनलग्नBeauty TipsMakeup Tipsfashionmarriage