दिवाळीचा थकवा गेलाच नाही- फराळ खाऊन वजनही वाढलं? ५ टिप्स- शरीर डिटॉक्स होऊन वजन उतरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2024 05:38 PM2024-11-06T17:38:45+5:302024-11-06T17:45:53+5:30

दिवाळीचे आधीचे काही दिवस प्रचंड कामाचे, धावपळीचे असतात. तसेच दिवाळीचे तीन दिवस आणि त्यानंतरचे एक- दोन दिवस धावपळ, पळापळ सुरूच असते.

हे सगळे संपल्यावर आपले शरीर खूप थकले आहे, याची जाणीव व्हायला लागते. आराम करण्यासाठी पुरेसा वेळही मिळत नाही. शिवाय फराळाच्या पदार्थांवर यथेच्छ ताव मारल्यामुळे तसेच सगळ्यांमध्ये बसून जरा जास्तच जेवण केल्यामुळे वजन वाढलं असल्याचंही दिसू लागतं.

म्हणूनच आता अंगातला थकवा घालविण्यासाठी आणि थोडंसं वाढलेलं वजन झटकन कमी करण्यासाठी बॉडी डिटॉक्स करायलाच हवी. ते नेमकं कसं करायचं म्हणजेच post-festival detox याविषयी योग अभ्यासक गौरव वर्मा यांनी दिलेली माहिती एनडीटीव्हीने प्रकाशित केली आहे.

त्यामध्ये सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दिवसाची सुरुवात लिंबू पाणी पिऊन करा. बॉडी डिटॉक्स होऊन पचनक्रिया सुधारण्यासाठी ते महत्त्वाचं ठरतं. त्यात थोडा आल्याचा रस घालून प्यायल्यास अधिक उत्तम.

नाश्त्यामध्ये नियमितपणे काही दिवस मोड आलेली कडधान्ये वाफवून खा. त्यांच्यामधून भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स आणि ओमेगा ३ फॅटी ॲसिड मिळते.

रात्री झोपण्यापुर्वी ग्लासभर पाण्यात बडिशेप, जीरे आणि मेथी दाणे भिजत घाला. दुसऱ्या दिवशी ते पाणी गाळून घ्या आणि कोमट करून प्या. पचन, चयापचय क्रिया व्यवस्थित होईल.

पुढचे काही दिवस मीठ आणि साखर कमीतकमी प्रमाणात खा. साखर पुर्णपणे बंद केल्यास अधिक उत्तम.

ताजी फळं खा. तसेच भाज्यांचे सूप पिण्यावर भर द्या. हे काही उपाय नियमितपणे केल्यास वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल. तसेच अंगातला थकवा जाऊन तरतरी येईल.