Ram Mandir Rangoli Design : रामललांच्या स्वागतासाठी दारापुढे काढा १० सोप्या रांगोळी डिजाईन्स; पाहा राम मंदीराची खास रांगोळी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 03:39 PM2024-01-20T15:39:53+5:302024-01-21T11:52:37+5:30

Ram Mandir Rangoli Design : राम मंदीराप्रमाणे कलाकृती बनवून आजूबादूला दिवे लावून तुम्ही सुंदर मंदिराचे रूप साकारू शकता.

येत्या २२ जानेवरीला राम जन्मभूमीतील प्राण प्रतिष्ठेचा सोहळा साजरा केला जाणार आहे.(Ram Mandir Rangoli Design) या निमित्ताने देशभरात सर्वचजण अगदी थाटामाटात रामललांचे स्वागत करणार आहेत. या सोहोळ्याची तयारी प्रत्येकजण आपापल्या परीने करत आहे. (Rangoli For Ram Mandir 22 January)

श्री रामाच्यां स्वागतासाठी दारासमोर काढता येईल अशा रांगोळ्याच्या डिजाईन्स पाहूया. यामुळे घर अधिक उठून दिसेल आणि दाराचे सौंदर्य वाढेल.

देव्हाऱ्याजवळ किंवा दारासमोर तुम्ही अशी रांगोळी काढू शकता ज्यात माता सिता आणि लक्ष्ण रामासह एकत्र दिसत असतील. या फोटोतील रांगोळीच्या डिजाईन्सच्या रांगोळीप्रमाणे सोपी रांगोळी तुम्ही काढू शकता.

राम मंदीराप्रमाणे कलाकृती बनवून आजूबादूला दिवे लावून तुम्ही सुंदर मंदिराचे रूप साकारू शकता.

साधं मंदीर काढून त्यात श्री राम असं रांगोळीने लिहू शकता. तरीही शोभून दिले. या रांगोळी साठी तुम्ही पिवळ्या किवा नारंगी रंगाचा वापर केला तर अधिकच उठून दिसेल.

जर तुमची ड्रॉईंग फार चांगली नसेल तर तुम्ही आधी चॉकने रांगोळी काढून नंतर त्यात रंग भरू शकता.

दरवाज्यात तुम्ही पट्टीच्या डिजाईन्सची रांगोळी काढू शकता.

तुम्हाला रांगोळी काढायचा फारच कंटाळा येत असेल तर श्री राम असलेले लिहिलेले ठसे तुम्हाला कोणत्याही दुकानात सहज मिळतील.

मोर किंवा फुलाच्या डिजाईन्सची रांगोळी काढू शकता. येता जाताना रांगोळीला सर्वांचे पाय लागत असतील तर तुम्ही साधी ठिपक्याची रांगोळीही काढू शकता.

(Image Credit- Social Media)