दिवाळीत दारासमोर काढा आकर्षक-सुंदर बॉर्डर डिजाईन्स; एक से एक सोप्या रांगोळी डिजाईन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 09:34 AM2023-11-04T09:34:00+5:302023-11-11T10:38:08+5:30

Rangoli Border Designs for Diwali : रांगोळीत तुम्ही लक्ष्मीची पाऊलं, स्वास्तिक किंवा फुलांच्या डिजाईन्स ट्राय करू शकता.

दिवाळीच्या (Diwali 2023) दिवसांत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रांगोळी. पण आजकाल रांगोळ्या काढण्यासाठी प्रत्येकालाच वेळ मिळतो असं नाही. मोठया रांगोळ्या काढणं जमत नसेल तर तुम्ही बॉर्डर डिजाईन्सच्या रांगोळ्या काढू शकतात. या रांगोळ्या काढण्यासाठी फार वेळ लागत नाही अगदी कमी वेळात काढून होतात. (Diwali special border rangoli design)

साधी तितकीच आकर्षक रांगोळी तुम्ही काढण्याच्या विचारात असाल तर या डिजाईन्स ट्राय करू शकता. (Daily border rangoli)

बॉर्डरच्या रांगोळी डिजाईन्स (Latest Border Rangoli Designs) काढण्यासाठी तुम्ही कंगवा, चहाची गाळणी, हेअर पिन्स किंवा मासिसच्या काड्यांचा वापर करू शकता.

संस्कार भारती रांगोळीच्या छोट्या छोट्या डिजाईन्स पट्टीच्या डिजाईन्समध्ये काढता येतील किंवा ठिपक्यांच्या साहाय्याने रांगोळी काढू शकता. (Border Rangoli Designs for Doors and Side Wall)

या डिजाईन्स तुम्ही देव्हाऱ्याजवळ किंवा दरवाज्यात काढू शकता. जर तुम्ही पहिल्यांदाच रांगोळी काढत असाल तर आधी पेन्सिलने ड्रॉ करून मग रांगोळी काढा.

जर तुम्हाला व्यवस्थित काढता येत नसेल तर तुम्ही रेडिमेड रांगोळीच्या गाळणीचा किंवा साच्याचा वापर करू शकता.

रांगोळीत तुम्ही लक्ष्मीची पाऊलं, स्वास्तिक किंवा फुलांच्या डिजाईन्स ट्राय करू शकता.

आधी गाळणीच्या साहाय्याने रांगोळी काढून नंतर त्यावर खडू किंवा पेन्सिलने हव्या त्या आकाराची डिजाईन्स काढून घ्या

रांगोळी काढण्यासाठी तुम्ही रांगोळी काढण्यासाठी उपलब्ध असलेल्या पेन्सिलचा वापरही करू सकता.

रांगोळीवर कॉन्ट्रास्ट किंवा सेम रंगाची चमकी घालू शकता. यामुळे रांगोळी अधिकच उठून दिसते.

पानं, कुहिरी आणि आकर्षक फुलांची रांगोळी तुम्ही काढू शकता.

बॉर्डरच्या रांगोळीच्या अवतीभोवती तुम्ही आर्टिफिशियल मेणाचे किंवा तेलाचे दिवे लावू शकता.

जर तुम्ही संस्कारभारती रांगोळी काढणार असाल तर जाड रांगोळी विकत घ्याल याची खात्री करा. याशिवाय ठिपक्यांच्या रांगोळीसाठी बारीक रांगोळी वापरू शकता.

रांगोळीचे पुस्तक किंवा युट्युबवर तुम्हाला सोप्या पद्धतीनं रांगोळी काढण्याच्या बऱ्याच ट्रिक्स मिळतील. ज्यामुळे तुमचा वेळही वाचेल.

रांगोळीत जास्तीत जास्त डार्क रंगांचा वापर करा. रांगोळी तुम्ही आपल्या आवडीनुसार डार्क किंवा सौम्य शेड्सचा वापर करू शकता.