दसऱ्याला दारात, देवासमोर काढा सुबक रांगोळी, घ्या एक से एक सुंदर-सोप्या डिझाईन्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2023 01:19 PM2023-10-23T13:19:50+5:302023-10-23T13:30:03+5:30

Rangoli Designs for Dasra

वर्षभरातला मोठा सण असलेल्या दसऱ्याला आपण दारात आणि देवापुढे आवर्जून रांगोळी काढतो. झटपट आणि तरीही सुंदर रांगोळी काढायची तर डिझाईन्स सुचायला हव्यात, त्यासाठीच पाहूया काही खास डीझाईन्स (Rangoli Designs for Dasra)...

नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे दसरा, रांगोळीतून देवीचा जागर करायचा असेल तर देवीचा थोडा सोपा असा मुखवटा आपण नक्कीच काढू शकतो. रांगोळीच्या रुपातून या शक्ताचे दर्शन घडेल.

आपट्याची पानं आणि सरस्वती यांचे दसऱ्याला आवर्जून पूजन केले जाते. ही प्रतिके रांगोळीतून दाखवायची असल्यास विविध रंगांचा वापर करुन आपण सोपी तरी सुबक अशी रांगोळी काढता येऊ शकते.

पारंपरिक रांगोळी वापरायची नसेल तर विड्याची पाने, तांदूळ, सुपारी, बदाम, बांगड्या, फुलांची पाने आणि हळद-कुंकू यांचा वापर करुन आपण अशी छानशी रांगोळी काढू शकतो.

रांगोळीतील जास्तीची कलाकुसर जमत नसेल आणि तरीही सुबक रांगोळी काढायची असेल तर अशाप्रकारे विविध रंगांचा वापर करुन आपण देवीचा छानसा चेहरा काढू शकतो.

घरात फरशीवर रांगोळी नीट दिसणार नाही असे वाटत असेल तर एखाद्या रंगाचा गालिचा काढून त्यावर काढलेले घट आणि देवीचा प्रतिकात्मक चेहरा ही रांगोळीही दसऱ्याला आपण आवर्जून काढू शकतो.

पाटीपूजनाची प्रतिकात्मक पाटी, त्यावर सरस्वती आणि आपट्याची पाने, दांडीया यांसारख्या गोष्टीही रांगोळीत काढायला सोप्या आणि दिसायला सुंदर दिसतात.

दसरा म्हटला की झेंडूच्या फुलांचे तोरण ओघानेच आले, हेच तोरण आणि झेंडूची फुले, आपट्याची पाने रांगोळीत अतिशय सुरेख दिसतात आणि काढायलाही तुलनेने सोपी असतात.

घरात किंवा दारासमोर थोडी जास्त जागा असेल आणि रंगबिरंगी डीझाईन आवडत असेल तर अशाप्रकारची रांगोळी नक्की काढू शकता. विविध रंगांच्या वापरामुळे रांगोळी खुलून यायला मदत होते.

जास्तीचा वेळ आणि थोडी कलाकुसर करण्याची तयारी असेल तर घट, साडी, दागिने अशी क्रिएटीव्हिटी असणारी रांगोळी एकदा नक्की ट्राय करा.