फक्त ४ वर्षात नॅशनल क्रश बनली रश्मिका मंदान्ना; तिची एका चित्रपटाची फी अन् एकूण संपत्ती इतकी प्रचंड की..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 12:08 PM2022-01-16T12:08:57+5:302022-01-16T13:04:22+5:30

Rashmika Mandanna :रश्मिकाने तिच्या सुंदर दिसण्याने आणि दमदार अभिनयाने यशाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. रश्मिकाकडे एकापेक्षा एक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर आल्या आहेत.

दक्षिण भारतीय लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) गेल्या चार वर्षात नॅशनल क्रश बनली आहे. तसेच तिने फिल्मी दुनियेत घवघवीत यश मिळवून. या चार वर्षात नावासोबतच भरपूर संपत्तीही कमावली आहे. (Rashmika Mandanna Movie) साऊथ फिल्म इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूडमध्येही रश्मिकाची जबरदस्त फॅन फॉलोइंग पाहायला मिळते. जरी तिने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही.

सध्या पुष्पा (Pushpa : The Rise) चित्रपट बॉक्स बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. कोरोना काळातही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा पार करत बक्कळ कमाई केली. या चित्रपटाची नायिका रश्मिका पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

रश्मिकाने २०१६ साली किरिक पार्टी या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. पहिल्याच चित्रपटापासून ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

रश्मिकाने तिच्या सुंदर दिसण्याने आणि दमदार अभिनयाने यशाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. रश्मिकाकडे एकापेक्षा एक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर आल्या आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदान्ना एका चित्रपटात काम करण्यासाठी सुमारे 3 ते 4 कोटी रुपये घेते. रिपोर्टनुसार, रश्मिका मंदान्ना यांच्याकडे 30 कोटींची संपत्ती आहे. तिच्याकडे आलिशान व्हिला देखील आहे, जो बंगळुरूमध्ये आहे, त्याची किंमत 8 कोटी आहे.

रश्मिका मंदान्ना अनेक आलिशान वाहनांची मालकीण आहे. त्याच्याकडे ५० लाखांची मर्सिडीज बेंझ सी-क्लास, ४० लाखांची ऑडी क्यू३, टोयोटा इनोव्हा आणि ह्युंदाई क्रेटा, रश्मिकाचे बंगळुरूशिवाय गोव्यातही आलिशान घर आहे. याशिवाय अभिनेत्रीचा हैदराबादच्या गची बाओलीमध्ये एक कोटींचा बंगला आहे.

रश्मिकाने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत 11 चित्रपट केले आहेत. तिच्या शानदार चित्रपट कारकिर्दीच्या जोरावर ती अनुष्का शेट्टीलाही स्पर्धा देते. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, नुकताच रश्मिकाचा पुष्पा रिलीज झाला आहे, जो प्रेक्षकांमध्ये खूप चर्चा करत आहे.

रश्मिका तिच्या 'मिशन मजनू' या डेब्यू चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. शंतनू बागची दिग्दर्शित 'मिशन मजनू' यावर्षी 13 मे रोजी रिलीज होण्याची शक्यता आहे.

'गुडबाय' या दुसऱ्या चित्रपटात रश्मिका बॉलीवूडचे बादशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे.