दंड खूप जाड असतील तर युनिक ब्लाऊज डिजाईन्स ट्राय करा; साडीमध्ये स्लिम, सुंदर दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 04:25 PM2023-01-18T16:25:13+5:302023-01-18T17:04:06+5:30

Saree blouse sleeves designs : काठापदराच्या साडीवर शॉर्ट ब्लाऊज न शिवता तुम्ही थ्री फोर स्लिव्हजचं ब्लाऊज शिवू शकता.

बाजारातून आपण कितीही महागड्या साड्या खरेदी केल्या पण त्यावर डिजायनर ब्लाऊज नसेल तर पूर्ण लूक खराब होतो. अशात साडीत आपण बारीक दिसावं. साडी चापून चोपून नेसली जावी असं प्रत्येकालाच वाटतं. (Saree blouse sleeves designs)

काठापदराच्या साडीवर शॉर्ट ब्लाऊज न शिवता तुम्ही थ्री फोर स्लिव्हजचं ब्लाऊज शिवू शकता.

थ्री फोर हँण्डवर कॉलर नेक डिजाईन तुम्हाला प्रोफेशनल लूक देईल. ऑफिसला जाताना तुम्ही असा लूक कॅरी करू शकता.

डिप नेक पॅटर्नमध्ये तुम्ही अधिकाधिक बोल्ड दिसाल.

कॉटनचं फूल बाह्याचं ब्लाऊज तुम्हाला प्लेन साडीवर शिवता येईल.

बोट नेक पॅटर्नसुद्धा ट्रेंडीग आहे. असं ब्लाऊज घातल्यानंतर तुम्हाला जास्त दागिने घालण्याची गरज भासणार नाही.

या फोटोमध्ये विद्या बालनने फुल स्लीव्ह ब्लाउज कॅरी केलेला दिसत आहे. जर तुमचे हात जाड असतील तर शक्य असल्यास, गडद रंगाचे फॅब्रिक निवडा. काळा ब्लाउज सर्व रंग आणि पॅटर्नच्या साड्यांसोबत चांगला जातो. हा रंग तुमच्या हातांची चरबी देखील लपवतो आणि तुमचे हात सडपातळ दिसतात.

तुम्ही नेट किंवा शिमर लुक फॅब्रिकचे ब्लाउज बनवू शकता कारण या सर्व फॅब्रिक्समुळे तुमचे हात अधिक बारीक दिसतील. त्यांची फिटिंगपण खूप छान बसते.