'या' ६ प्रकारच्या साड्या नेहमीच देतात 'क्लासी लूक'! मेंटेन करायला आणि नेसायलाही अगदी सोप्या... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2023 02:36 PM 2023-12-08T14:36:37+5:30 2023-12-08T14:59:31+5:30
काही साड्या अशा असतात ज्या आपल्या अंगावर खूप छान दिसतात तसेच अगदी व्यवस्थित चापून- चोपून नेसता येतात. त्याउलट काही साड्या मात्र अंगावर अजिबात खुलत नाहीत.
म्हणूनच आता आपण साड्यांचे असे काही प्रकार पाहूया जे तुम्हाला नेहमीच क्लासी लूक देतील आणि शिवाय त्या साड्या नेसायलाही अगदी सोप्या असतील. त्यामुळेच अशा काही फॅब्रिकच्या साड्या तुमच्या कलेक्शनमध्ये आवर्जून असायलाच पाहिजेत..
त्यापैकी सगळ्यात पहिली साडी आहे ऑर्गेंझा सिल्क. सध्या या साड्यांचा खूप जबरदस्त ट्रेण्ड असून त्यांचं सूत अतिशय मऊ आणि आरामदायी असतं. त्यामुळे या साड्या इतर साड्यांपेक्षा थोड्या महागही असतात.
दुसरा प्रकार आहे टिशू सिल्क साड्या. या साड्या वास्तवात खूप महाग नसतात, पण त्यांचा लूक मात्र एकदम क्लासी असतो.
चंदेरी सिल्क प्रकारातल्या साड्या नेसायला खूप सोप्या असतात. शिवाय या साड्या लाईटवेट असल्याने त्या बराच वेळ अंगावर असल्या तरी अजिबात अवघडल्यासारखे होत नाही.
रॉ सिल्क प्रकारातल्या साड्यांचीही सध्या चांगलीच क्रेझ आहे. या प्रकारातल्या साड्याही अंगावर खूप सुंदर दिसतात.
पार्टिवेअर लूक हवा असेल तर अशा ठिकाणी क्रेप साड्या नेसण्यास प्राधान्य द्या. या साड्यांमध्ये सध्या खूप सुंदर व्हरायटी मिळत आहेत.
शिफॉन साड्यांनी त्यांची लोकप्रियता नेहमीच टिकून ठेवली आहे. प्लेन शिफॉन साडी, त्यावर प्रिंटेड ब्लाऊज आणि त्याला मॅच करणारी इंडोवेस्टर्न ज्वेलरी असं कॉम्बिनेशन केलं तर नेहमीच चारचौघीत उठून दिसाल.