खास हिवाळ्यातल्या लग्नसराईसाठी 'साडी विथ जॅकेट'चा मस्त ट्रेण्ड, दिसा स्टायलिश-कुडकुडण्याचीही भीती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2023 01:14 PM2023-12-28T13:14:45+5:302023-12-28T16:26:29+5:30

हिवाळ्यात रात्रीचे लग्न, रिसेप्शन असले की थंडी वाजून खूपच कुडकुडायला होतं. त्यामुळेच ही साडी विथ जॅकेटची खास हिवाळ्यासाठी असणारी फॅशन एकदा बघून घ्या.

अशा पद्धतीने साडी आणि जॅकेट घालून कार्यक्रमाला गेलात तर थंडी वाजणार नाही. त्यामुळे कार्यक्रमही छान एन्जॉय करता येईल. शिवाय तुमच्या या स्टाईलमुळे तुम्ही अतिशय आकर्षक आणि चारचौघीत उठून दिसाल.

एखाद्या रिसेप्शनसाठी जाणार असाल तर करिनाचा हा लूक पाहा.. एकदम स्टायलिश दिसाल.

फॉर्मल कार्यक्रमांसाठी, रिसेप्शनसाठी असा लूकही करता येईल. यामध्ये साडीचा पदर फक्त पुढच्या बाजुने वळवून घेतला आहे.

एखाद्या लग्न समारंभासाठी असा सुंदर लूक करता येईल. त्यासाठी साडीवर मॅच होणारं असं भरजरी जॅकेट घ्या.

तापसी पन्नूसारखा असा लूकही लग्न समारंभासाठी छान दिसतो. यासाठी जॅकेटची निवड मात्र परफेक्ट जमून आली पाहिजे. ऑनलाईन शॉपिंग साईटवरही असे एम्ब्रॉयडरी केलेले, वर्क केलेले अनेक जॅकेट आहेत.

कतरिनाचा हा एक लूक पाहून घ्या... अशा पद्धतीचं जॅकेट शिवायचं असेल तर कॉन्ट्रास्ट रंगाचं जॅकेट शिवलं तरी चालेल.

शिफॉन किंवा ऑर्गेंझा साडीवर असं ब्लेझरसारखा लूक देणारं जॅकेट तुम्ही रिसेप्शन, फॉर्मल मिटिंग किंवा मग ऑफिससाठीही घालू शकता. खास हिवाळ्यातल्या लग्नसराईसाठी 'साडी विथ जॅकेट'चा मस्त ट्रेण्ड, दिसाल स्टायलिश- थंडीही वाजणार नाही