खणाच्या साड्यांची क्रेझ तर आहेच, पाहा खणाच्या ‘या’ ट्रेंडी वस्तू! ब्लाऊज ते ड्रेस सगळंच मस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2025 19:48 IST2025-03-05T19:38:40+5:302025-03-05T19:48:29+5:30

See These Different Things Made Of Khun Fabrics : खणाच्या कापडापासून फक्त साडीच नाही तर, अनेक वस्तूही तयार करता येतात. पाहा आणि तुम्हीही वापरा.

आपल्याकडे कापडामध्ये, त्याच्या डिझाइनमधे भरपूर विविधता असल्याचे आढळून येते. प्रत्येक प्रकार स्वत:चे नाविन्य जपून आहे.

त्यापैकी एक अत्यंत लोकप्रिय म्हणजे खणाचे कापड. वेगवेगळ्या रंगांमध्ये तर ते मस्त उठून दिसते.

खणाच्या कापडापासून तयार केले जाणारे काही प्रकार पाहूया.

साड्यांचे कलेक्शन म्हटलं की त्यात खणाची साडी असायलाच हवी. दिसायला फारच सुंदर दिसते. या साडीला रॉयल लूक आहे.

खणाचे ड्रेसही फार लोकप्रिय आहेत. शरीराला फारच छान बसतात. फार कंम्फर्टेबलही असतात. रोजच्या वापरासाठी तसेच समारंभांसाठीही वापरू शकता.

लहान मुलींसाठी मस्त असा खणाचा ड्रेस शिवा. त्यांना नक्कीच आवडेल. सांभाळायचे कष्ट नाहीत आणि दिसतोही अगदी मराठमोळा.

खणाच्या कापडाच्या पर्स आजकाल ट्रेंडींगमध्ये आहेत. वाण म्हणून देण्यासाठीही या पर्सचा अनेक जणी वापर करतात.

खणाच्या कापडापासून तोरण अनेक जण शिऊन घेतात. विकतही मिळते. ते तोरण रंगीबेरंगी असे छान दिसते.

खणाची नऊवारी तर कमालच दिसते. पारंपारिक पद्धतीने नेसली की महिलेचा साज काही औरच दिसतो.

खणाच्या कापडाचा वापर करून आता दागिनेही तयार केले जातात. सगळीचे उपलब्ध नसले तरी ऑनलाइन मागवू शकता.

खणाचे कानातले मात्र फारच सुंदर दिसतात. कानातल्यांना खणाचे कापड चिकटवून ते तयार केले जातात.