नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी घरी आणा ७ शुभ वस्तू, वर्षभर घर राहील प्रसन्न, वाटेल पॉझिटिव्ह By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 01:32 PM 2023-12-20T13:32:28+5:30 2023-12-20T16:11:43+5:30
Seven Things That Will Bring Good Luck to Your Home : नवीन वर्ष सुरू होण्याआधीच तुम्ही काही वस्तू घरात आणून ठेवल्या सकारात्मक वातावरण राहील. येणारं नवीन वर्ष आपल्यासाठी सुखा-समाधानाचं आनंदाचं जावं असं प्रत्येकाला वाटतं.(Little Things That Bring Good Luck to You Home) म्हणून नवीन वर्ष सुरू होण्याआधीच तुम्ही काही वस्तू घरात आणून ठेवल्या सकारात्मक वातावरण राहील. अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या घरात ठेवल्याने घरातील वातावरण चांगले राहण्यास मदत होते ते पाहूया.
लाफिंग बुद्धा अनेकांच्या घरात तुम्हाला लाफिंग बुद्धाची छोटी किंवा मोठी मूर्ती पाहायला मिळेल. असं मानलं जातं की घरात लाफिंग बुद्धा असतील तर घरात कशाचीही कमतरता भासत नाही. घर आनंदी राहतं.
मोरपीस मोरपंखाकडे पाहिलं तरी मन आनंदून जातं. नवीन वर्षाच्या सुरूवातीला जर तुम्ही मोरपीस घरी आणून ठेवले तर डेकोरेशनसाठी एक उत्तम पर्याय असेल. हॉलच्या भिंतीवर किंवा देव्हाऱ्याजवळ तुम्ही मोरपीस ठेवू शकता.
धातूचा कासव धातूचा कासव घरी ठेवणं फार लकी मानलं जातं. छोटा धातूचा कासव अनेकजण पाण्यात ठेवून एका भांड्यात कायम घरात ठेवतात.
मनी प्लांट मनी प्लांट घराची शोभा वाढवण्याच्या दृष्टीने परफेक्ट रोपं आहे. ज्यामुळे बाल्कनी बहरेल आणि घर कायम पॉझिटिव्ह राहील. मनी प्लांट हे असं सुंदर रोप आहे जे तुम्ही घरात कुठेही लावू शकता. या रोपाला जास्त पाणी आणि सुर्यप्रकाशाची गरज नसते.
तुळस तुळशीचे अनेक औषधी फायदे आहेत. याशिवाय तुळशीची पूजा देखिल केली जाते. जर तुमच्या घरात असलेल्या तुळशीची पानं कोमेजली असतील किंवा पानांची व्यवस्थित वाढ होत नसेल तर नवीन वर्षात नवीन तुळशीचे रोप घरी आणा.
धातूचा हत्ती अनेक शो पिसच्या दुकानांमध्ये धातूचा हत्ती विकला जातो. तुम्ही धातूऐवजी लाकडाचाही हत्ती घरात ठेवू शकता.
तुमचे आवडते पुस्तक तुमची आवडती पुस्तकं घरी आणून ठेवा. जेणेकरून तुम्हाला नवीन वर्षात जास्तीत जास्त वेळ आवडीची पुस्तकं वाचण्यास घालवता येईल. सध्या मोबाईल्समुळे लोकांचे पुस्तकं वाचण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जर तुम्ही पुस्तकं आणलीत तर नवीन काहीतरी करण्याचा आनंद मिळेल.
डायरी आजकाल बाजारात सुंदर सुंदर डिजाईन्सच्या डायरीज उपलब्ध होतात. तर कस्टमाईज डायरीज सुद्धा बनवून मिळतात. अशी डायरी नवीन वर्षाच्या सुरूवातीला विकत घेऊन तुम्ही त्यात आपले अनुभव, दैनंदीन कामात येणारे चॅलेंन्स, तुम्हाला कराव्याश्या वाटतात अशा नवीन गोष्टींबद्दल लिहू शकता.