Sexual Health : संबध ठेवताना कंडोम फाटलं तर.....? सुरक्षित सेक्ससाठी गर्भनिरोधक वापरताना लक्षात ठेवा 5 गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 04:20 PM2022-03-13T16:20:52+5:302022-03-13T16:44:50+5:30

Sexual Health : संभोगादरम्यान कंडोम फाटलं, अडकलं तर काय...? गर्भनिरोधक वापरताना 'अशी' घ्या काळजी

सुरक्षित इंटिमेट रिलेशन्ससाठी (Sex life) प्रोटेक्शन्सच्या वापरावर भर दिला जातो. अनेकदा प्रक्रियेदरम्यान प्रोटेक्शन म्हणजेच कंडोम (Condom) फाटण्याची भीती असते. यामुळेच अनेक कपल्स आपली सेक्शुअल लाईफ व्यवस्थित इन्जॉय करू शकत नाही. मनात प्रोटेक्शन डॅमेजची भीती असते. (Causes of condom damage)

अशी अनेक कारणं आहेत ज्यामुळे संभोगादरम्यान कंडोम डॅमेज होऊ शकते. टाईम्स ऑफ इंडीयाच्या वेबसाईडनं याबाबत अधिक माहिती दिली आहे. कंडोमच्या वापराबद्दल काही गोष्टी माहीत असल्यास संभोगादरम्यान येत असलेल्या अडचणी टाळता येऊ शकतात. (Ways to avoid your condom from breaking during love making)

इंडिमेट रिलेशनदरम्यान एकाच वेळी दोन कंडोम वापरणे तुमच्यासाठी मोठी चूक ठरू शकते. कंडोमची रचना अशा प्रकारे केली जाते की एका वेळी एकच कंडोम वापरला जाऊ शकतो. जेव्हा तुम्ही एकाच वेळी दोन कंडोम वापरता, तेव्हा घर्षणामुळे त्यांची कार्यक्षमता बिघडते आणि कधीकधी डॅमेज होण्याची शक्यता असते.

कंडोम नेहमी थंड आणि सावलीच्या ठिकाणी ठेवा. थेट सूर्यप्रकाशापासून त्यांचे संरक्षण करा. खूप थंड ठिकाणी ठेवू नका अन्यथा प्रोडक्डची लवचिकता नष्ट होऊ शकते.

ल्यूबरिकंट्ससाठी वॅसलिन, नारळाचं तेल किंवा कोणत्याही लोशनचा वापर करू नका. ऑईल बेस्ट ल्यूबरिकंट्समुळे लेटेक्स कंडोम फाटू शकतात.

किंमत पाहून कंडोमची खरेदी करू नका. योग्य अनुभवासाठी कंडोमचा आकार योग्य असणे देखील महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला त्याच्या फिटिंगमध्ये अडचण वाटत असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तो क्षण एन्जॉय करू शकणार नाही. तसेच, अनफिट कंडोममुळे ते खराब होण्याची शक्यता जास्त असते.

कंडोम घालण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. माहितीच्या अभावी, लोक ते वापरण्यात चुका करतात आणि यामुळे त्यांना संभोगादरम्यान समस्यांना सामोरे जावे लागते.

लैगिंक विकार तज्ज्ञ डॉ. राजन भोसले सांगतात, ''कंडोम सुरक्षित आणि सहज उपलब्ध होणारं असल्यामुळे बरीच जोडपी वापरतात. याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. कंडोम महिलांच्या योनी अडकल्याचं खूप कमी प्रकरणात दिसून आलं आहे. जरी कंडोम अडकलं तरी यात घाबरण्यासारखं काही नाही.

स्वच्छ बोटांचा वापर करून तुम्ही ते सहज काढू शकता. टॉयलेट सीटमध्ये बसल्यानंतरही अडकलेलं कंडोम काही प्रमाणात बाहेर येऊ शकतं. जे तुम्ही हातानं खेचून सहज बाहेर काढू शकता. सर्वच जोडपी खासकरून महिलांना याबाबत माहिती असणं गरजेचं आहे.''