शहनाज हुसैन सांगतात तरुण त्वचेचं सिक्रेट- कोलॅजीनयुक्त ४ शाकाहारी पदार्थ खा, सुरकुत्या गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2025 17:36 IST2025-04-14T17:28:48+5:302025-04-14T17:36:59+5:30

त्वचेमधलं कोलॅजीन जेव्हा कमी होत जातं तेव्हा त्वचेवर बारीक सुरकुत्या यायला सुरुवात होते. त्यामुळे कमी वयात जर त्वचेवर सुरकुत्या नको असतील तर कोलॅजिन देणारे काही पदार्थ आपल्या आहारात नियमितपणे असायला हवे.

ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती सेलिब्रिटी ब्यूटी एक्सपर्ट शहनाज हुसैन यांनी शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी त्वचा दिर्घकाळ तरुण आणि सुंदर ठेवायची असेल तर ४ पदार्थ आवर्जून खायला हवेत, असं सुचवलं आहे.

त्यापैकी पहिला पदार्थ आहे स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी अशी बेरी प्रकारातली फळं. या फळांमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील कोलॅजिन निर्मिती वाढण्यास वाव मिळतो.

संत्री, द्राक्ष, लिंबू, मोसंबी, किवी अशी व्हिटॅमिन सी असणारी फळं पुरेशा प्रमाणात खाल्ल्यानेही शरीरातील कोलॅजीनची पातळी वाढते.

अव्हाकॅडोमध्ये व्हिटॅमिन ई, सी, कॉपर आणि फोलेट योग्य प्रमाणात असते. शिवाय त्यातून त्वचेसाठी पोषक असणारे बायोटीनसुद्धा मिळते. त्यामुळे त्वचा तरुण ठेवण्यासाठी अव्हाकॅडो खाण्याचा सल्ला शहनाज हुसैन देतात.

तुळशीची पानंसुद्धा नियमितपणे खावी. कारण त्यातून ॲण्टीऑक्सिडंट्स, उर्सेलिक ॲसिड, रोसमारिनिक ॲसिड आणि युजेनॉल असे ॲण्टीऑक्सिडंट्स मिळतात जे त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात.