चारचौघांत बोलण्याचा कॉन्फिडन्स नाही- मनातलं कुणाला सांगताच येत नाही? शिल्पा शेट्टीने सांगितलेले ३ व्यायाम करा.... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2023 04:15 PM2023-12-05T16:15:10+5:302023-12-05T16:21:26+5:30

बऱ्याच जणींच्या बाबतीत असं होतं की सगळ्या गोष्टींची माहिती तर असते. पण मनातलं बोलण्याचा- दुसऱ्यांना काही सांगण्याचा कॉन्फिडन्स नसतो. अशावेळी मग त्यांच्या ज्ञानाचाही काही उपयोग होत नाही.

करिअरच्यादृष्टीने तर नुकसान होतेच. पण वैयक्तिक पातळीवरही असा स्वभाव खूप मारक ठरतो. मनातल्या गोष्टी मनातच राहात असतील, तर खूप कुचंबना होते. म्हणूनच चारचौघांत बोलण्याचा किंवा कमीतकमी आपल्या लोकांसमोर तरी खंबीरपणे बोलण्याचा आत्मविश्वास प्रत्येकीमध्ये असायलाच पाहिजे.

असा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होण्यासाठी कोणती योगासनं नियमितपणे केली पाहिजेत, याविषयीची माहिती अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने सोशल मिडियावर एका व्हिडिओद्वारे शेअर केली आहे.

शिल्पा शेट्टी म्हणते की सेतू बंधासन नियमितपणे केल्याने शरीराला इतर फायदे तर होतातच. पण विशद्धी चक्राची ताकद वाढविण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. यामुळे आपली मते, विचार मांडण्याची क्षमता निर्माण होते.

अर्ध हलासन आणि नौकासन केल्याने मनिपुरक चक्र मजबूत होण्यास मदत होते.

या दोन्ही आसनांमुळे आत्मविश्वास आणि कोणतेही काम करण्याची क्षमता वाढते.