जुन्या झालेल्या माठातील पाणी प्यावे की नाही? ४ टिप्स, पचनाचे त्रास नको असतील तर..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2025 17:05 IST2025-04-21T17:00:00+5:302025-04-21T17:05:01+5:30
Is it safe to drink old clay pot water: Clay pot water side effects: Drinking matka water tips: Clay pot and digestion: जुन्या मातीच्या माठातील पाणी प्यायल्याने सर्दी-खोकल्यासारख्या संसर्गाची तक्रार वाढते.

उन्हाळा सुरु झाला की आपण थंडगार माठातील पाणी पितो. मातीच्या भांड्यातील पाणी शरीराला थंडावा देते. भांड्यामध्ये खनिजांची गुणवत्ता जास्त प्रमाणात असते. (Is it safe to drink old clay pot water)
अनेकदा उन्हाळा गेल्यानंतर आपण मातीची भांडी पुन्हा ठेवून देतो आणि पुन्हा पुढच्या वर्षी त्याचा वापर करतो. परंतु, असे करणे आरोग्याच्यादृष्टीने चुकीचे मानले जाते. (Clay pot water side effects)
जुन्या मातीच्या माठातील पाणी प्यायल्याने सर्दी-खोकल्यासारख्या संसर्गाची तक्रार वाढते. जुन्या मातीच्या भांड्यात पाणी प्यायल्याने काय होते पाहूया. (Drinking matka water tips)
जुना माठ धुतल्यानंतर बॅक्टेरिया असू शकतात. त्यासाठी धुतल्यानंतर ते नीट वाळू द्या. हे जीवाणू पाण्याद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करु शकणार नाही.
पाण्यातील खनिजे भांड्यांच्या पृष्ठभागावर जमा होऊ शकतात. पुन्हा वापरल्यास ते पाण्यात मिसळण्याची शक्यता असते. ज्यामुळे आरोग्याचे नुकसान होईल.
जुन्या माठाला वातवरणामुळे शैवाळ येऊ शकते. जर ती सूर्यप्रकाशात ठेवली नाही किंवा योग्यरित्या स्वच्छ केली नाहीत तर जंतू निर्माण होतात.
मातीचा माठ वर्षभरापेक्षा जास्त काळ वापरु नका. यामुळे आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. माठ धुतल्यानंतर जोपर्यंत तो पूर्णपणे कोरडा होत नाही. तोपर्यंत वापरु नका. माठाला सूर्यप्रकाशात ठेवा.
नवीन माठ खरेदी करत असाल तर पाण्यात भिजवून ठेवा. ज्यामुळे माठासाठी वापरलेला केमिकलचा रंग निघून जाण्यास मदत होईल.