simple rangoli designs for daily purpose at home, simple and easy rangoli designs
दारासमोर रोज कशी रांगोळी काढावी सुचतच नाही? ७ सोप्या डिझाईन्स, २ मिनिटांत काढा सुंदर रांगोळी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2024 09:00 AM2024-10-01T09:00:37+5:302024-10-01T09:12:30+5:30Join usJoin usNext दारासमोर रोज छोटीशीच रांगोळी काढायची असते. पण ती कशी काढावी, हे बऱ्याचदा सुचत नाही. म्हणूनच हे काही साधे- सोपे डिझाईन्स पाहा. यामुळे तुम्हाला अगदी १- २ मिनिटांत झटपट रांगोळी काढता येईल. हे एक साधे- सोपे डिझाईन. दिसायला अवघड वाटत असले तरी काढायला अगदी सोपे आहे. एकदा नक्कीच ट्राय करून पाहा. झटपट काढून होणारं हे एक आणखी सोपं डिझाईन. यातल्या पाकळ्यांचा आकार अगदी एकसारखाच यायला हवा, असंही काहीच नाही. मध्यभागी एक छोटंसं फुल आणि त्याच्या आजुबाजुला लहानसा वेल हे तुम्ही दारासमोरही काढून शकता. तसेच देवघरासमोरही काढू शकता. हे एक आणखी सोपं आणि साधं डिझाईन. यात मधला आकार दरवेळी वेगवेगळा घेतला तर अनेक वेगवेगळे डिझाईन्स तयार होऊ शकतात. दारासमोर काढलेली फुलाची नक्षी तर कधीही छानच दिसते. ही एखादी रांगोळी तुम्ही नक्कीच ट्राय करून पाहू शकता. हे चटकन काढून होणारं अगदी साधं- सोपं डिझाईन, एकदा नक्कीच ट्राय करून पाहा.. रांगोळी काढण्याचं काम झटपट होईल. असं एखादं फुलंही तुम्ही दारासमोर रोज काढू शकता. टॅग्स :रांगोळीसोशल व्हायरलrangoliSocial Viral