फक्त १० रुपयांत आणि १० मिनिटांत मिळेल उजळ- चमकदार त्वचा, करा शुगर स्क्रबचा जादुई उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2022 08:33 AM2022-08-20T08:33:05+5:302022-08-20T08:35:06+5:30

त्वचेकडे व्यवस्थित लक्ष देणं झालं नाही की ती खूपच डल, निस्तेज (dull skin) दिसू लागते. अशावेळी मग आपण पार्लर गाठून फेशियल, क्लिनअप करण्याचा विचार करतो.

पण प्रत्येकवेळी पार्लरमध्ये जाऊन एवढे पैसे घालविण्याची इच्छा होत नाही, आणि बऱ्याचदा आपल्याकडे तेवढा वेळही नसतो. म्हणूनच तर हा घ्या एक सोपा उपाय. फक्त १० मिनिटांत आणि १० रुपयांत घरच्याघरी मिळेल उजळ, चमकदार त्वचा. त्वचेवर येईल एक वेगळाच ग्लो.

शुगर स्क्रब (sugar scrub) हा एक अगदी सोपा आणि घरच्याघरी करता येण्यासारखा उपाय आहे. यामुळे त्वचेवरची डेड स्किन निघून जाईल. त्यामुळे त्वचा मुलायम तर होईलच पण त्यासोबचत त्वचेचं टॅनिंगही कमी होईल.

शुगर स्क्रब (sugar scrub) हा एक अगदी सोपा आणि घरच्याघरी करता येण्यासारखा उपाय आहे. यामुळे त्वचेवरची डेड स्किन निघून जाईल. त्यामुळे त्वचा मुलायम तर होईलच पण त्यासोबचत त्वचेचं टॅनिंगही कमी होईल.

शुगर स्क्रब करण्यासाठी एका वाटीमध्ये ग्रीन टी ची थोडी पाने घ्या. त्यात साखर आणि ऑलिव्ह ऑईल टाका. या मिश्रणाची पेस्ट तयार करा आणि त्याने हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. यानंतर काेमट पाण्याचे चेहरा धुवून टाका.

शुगर स्क्रब करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे एका वाटीत साखर आणि लिंबाचा रस हे सारख्या प्रमाणात घ्या. त्यात १ चमचा मध टाका. या मिश्रणाने चेहऱ्याला स्क्रब करा. काही वेळाने थंड पाण्याने चेहरा धुवून टाका.

हळद आणि साखर हे दोन्ही एकत्र करून त्याची पावडर करून घ्या. त्यात थोडे गुलाब पाणी टाका आणि त्याची पेस्ट करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि हलक्या हाताने ५ ते ७ मिनिटे मसाज करा. यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाका.

वरीलपैकी ज्या पद्धतीने तुम्हाला शुगर स्क्रब करणे सोयीस्कर वाटेल, त्या पद्धतीने करू शकता. चेहऱ्यावर नक्कीच चांगला परिणाम दिसून येईल.