स्लिव्ह्जलेस ड्रेस घातले की हात गुबगुबीत, खूप जाड दिसतात? ४ स्टायलिंग टिप्स, दंड दिसतील बारीक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 04:35 PM2023-03-28T16:35:31+5:302023-03-28T17:34:10+5:30

Sleeveless dress styling tips and tricks : आपल्या हातांचे फॅट लपविण्यासाठी, अशा प्रकारचे ब्लाउज वापरू शकता.

स्लिव्हजलेस किंवा सिंगल स्ट्रिप ड्रेस घालायचं म्हटलं की ज्यांचे हात फारच गुबगुबीत, जाड आहेत त्यांना खूपच ऑकवर्ड वाटतं. म्हणून ते नेहमीच थ्री- फोर हॅण्डचे किंवा फूड हॅण्ड्स ब्लाऊज घालतात. आपणं कायम उत्तम, कॉन्फिडंट दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. जर कोणत्याही फंक्शनसाठी तुम्ही आपले हात सुंदर, सुशोभित दिसावेत असे वाटत असेल तर तुम्ही काही स्टायलिंग टिप्स वापरू शकता. (How to Cover Your Arms in a Sleeveless Dress)

कपडे, सूट, लेहेंगा किंवा कोणताही पोशाख तयार करताना लक्षात ठेवा की आकर्षण तुमच्या हातापेक्षा तुमचा गळा आणि खांद्याकडे अधिक असावे. (Sleeveless dress styling tips and tricks)

आपल्या हातांना बलून किंवा पफ स्लीव्हज छान दिसतील आणि लूक स्टायलिश दिसेल, पण या स्लीव्हजमुळे तुमचे हात आणखी बारीक दिसतील.

काही स्त्रिया हाफ स्लीव्ह घालणे पसंत करतात. अर्ध्या बाहींची लांबी तुमच्या हाताच्या रुंद भागावर संपते, ज्यामुळे हात भरलेला दिसतो. तुम्हाला स्लिमर इफेक्ट हवा असेल तर, 3/4 स्लीव्हज निवडा. जर स्लीव्हची लांबी यापेक्षा जास्त असेल तर लक्ष तुमच्या मनगटाकडे जाते.

जर तुम्हाला मोठमोठे प्रिंट्स घालण्याचा शौक असेल तर ते जरूर घाला. पण हेवी वर्क आणि स्लीव्हजवर प्रिंट्स टाळा. स्लीव्हज किंवा मोठ्या प्रिंट्सवर केलेले जड काम व्हॉल्यूम वाढवते. तुमच्या स्लिव्ह्जमध्ये नाजूक, मऊ आणि हलके वर्क असावे.

आपल्या हातांचे फॅट लपविण्यासाठी, अशा प्रकारचे ब्लाउज वापरू शकता. लांब जाळीदार बाही असलेले टॉप्स उन्हाळ्यात नेहमीच लोकप्रिय असतात आणि उठून दिसतात.

सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, माधुरी दीक्षित, या अभिनेत्रीच्या ड्रेसिंग स्टाईल तुम्ही फॉलो करू शकता.

(Image Credit- Social Media)