Solutions For Gray Hair : पांढऱ्या केसांची समस्या विसरा, वापरा मसाल्याच्या डब्यातली १ गोष्ट- केस राहतील कायम काळेभोर-सुंदर By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 04:09 PM 2022-07-01T16:09:36+5:30 2022-07-01T17:06:34+5:30
Solutions For Gray Hair : वय वाढत असताना केस पांढरे होणे ही एक सामान्य घटना असली तरी, ऐन तारुण्यात, टीनएजर्समध्येही अकाली केस पांढरे होण्यास अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. अनियमित आहार, प्रदूषण, झपाट्याने बदलती जीवनशैली आणि रासायनिक उत्पादनांमुळे आपले केस खूप खराब होतात, ज्यामुळे ते निर्जीव आणि कोरडे होऊ लागतात. (White Hairs Problem) 25 ते 30 वर्षांच्या तरुणांच्या डोक्यावरही आजकाल पांढरे केस दिसतात. केस पिकल्यामुळे त्यांना कमी आत्मविश्वासाचा सामना करावा लागतो. (white hair problem solution mustard seeds)
अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातच यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. वय वाढत असताना केस पांढरे होणे ही एक सामान्य घटना असली तरी, वय आणि लिंग यांचा विचार न करता लोकांमध्ये अकाली केस पांढरे होण्यास अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. पण तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. मोहोरीच्या बियांचा वापर करून तुम्ही पांढरे केस पुन्हा काळे करू शकता. (Your Guide To Grey Hair Treatment)
पांढरे केस पुन्हा काळे करण्यासाठी तुम्ही मोहरीच्या बियांचा वापर करू शकता, कारण याद्वारे केसांना मुळापासून पोषण मिळेल. ((Mustard Seeds for White Hair) तसेच केस गळणे, केस खराब होणे आणि कोंडा या समस्यांपासून सुटका मिळेल.
केसांच्या आरोग्यासाठी मोहरीचे दाणे गुणकारी ठरू शकतात. व्हिटॅमिन ए मोहरीच्या दाण्यांमध्ये आढळते, जे एक पोषक तत्व आहे ज्याद्वारे ते टाळूचे पोषण करण्यास आणि केसांचे पुनरुत्पादन आणि कोलेजन वाढविण्यात मदत करते. याशिवाय, मोहरीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, ओमेगा-3 आणि व्हिटॅमिन ई सारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. जे केस मजबूत करण्याचे आणि काळेपणा परत आणण्याचे काम करतात. व्हिटॅमिन ईमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात जे टाळूमध्ये फ्री रेडिकल्सना प्रतिबंध करतात.
मोहोरीचा वापर कसा करायचा? मोहरीच्या दाण्यापासून काढलेले तेल केसांच्या आरोग्यासाठी कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही. प्रथम तेल गरम करा आणि नंतर केस आणि टाळूला मसाज करा. यामुळे मुळांमध्ये रक्ताभिसरण वाढेल आणि केस हळूहळू काळे होतील. सर्वप्रथम मोहरी बारीक करून वाळवून पावडर तयार करा.
आता एक स्वच्छ भांडे घ्या आणि त्यात एक चमचा मोहरी पावडर आणि एक अंडे मिसळा. आता त्यात खोबरेल आणि एरंडेल तेल मिसळून हेअर मास्क तयार करा आणि केसांच्या मुळापर्यंत लावा. शेवटी शॅम्पू आणि स्वच्छ पाण्याने केस धुवा.
केस पांढरे होणं टाळण्यासाठी हे लक्षात ठेवा १) निरोगी आणि संतुलित आहाराचे पालन केल्याने तुमचे केस अकाली पांढरे होणे कमी होईल.
२) व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ शकतात, म्हणून या जीवनसत्वाने समृद्ध असलेले पदार्थ समाविष्ट करा.
3) ताजी फळे आणि भाज्या, ग्रीन टी, ऑलिव्ह ऑईल, अँटिऑक्सिडंट्सचे समृद्ध स्रोत असलेले मासे यासारख्या पदार्थांचा समावेश करा. दूध, अंडी, ब्रोकोली, सीफूड, ब्लूबेरी या पदार्थांचे सेवन करा
4) तुम्ही दीर्घकाळ धूम्रपान करत असल्यास, धूम्रपान सोडणे चांगले. काळ्या केसांसाठी रसायनांनी भरलेल्या रंगांऐवजी या लेखात नमूद केलेले नैसर्गिक उपाय वापरून पहा.