दिवाळीनंतर खूप दिवसांनी व्यायामाला सुरुवात करताय? ४ चुका करू नका, तज्ज्ञ सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2022 04:16 PM2022-10-31T16:16:13+5:302022-10-31T16:22:07+5:30

१. दिवाळी आणि त्यानंतरच्या सुट्ट्या असा मागचा धावपळीचा आठवडा संपल्यानंतर आजपासून अनेक जणांनी त्यांचं रुटीन सुरू केलं आहे. ८- १० दिवसांचा गॅप झाल्यानंतर अनेकांचा व्यायामही नुकताच सुरू झाला असेल.

२. दिवाळीमध्ये फराळाच्या पदार्थांचा घेतलेला यथेच्छ आस्वाद, गोडधोड जेवण, तळलेले चवदार पदार्थ.... असं सगळं खाऊन संपलं की मग अचानक वाढलेल्या वजनाची जाणीव होते. थोडं वजन वाढलंच असणार असं वाटू लागतं.

३. अनेक जण एकदम टेन्शनमध्ये येतात आणि मग जणू मागची ८ दिवसांची व्यायामाची कसर २ दिवसांतच भरून काढावी, एवढ्या वेगात व्यायामाला लागतात. पण असं करणं किती चुकीचं आहे, याविषयी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी एक पोस्ट नुकतीच शेअर केली आहे.

४. यामध्ये त्यांनी दिवाळी संपल्यानंतर पुन्हा एकदा रुटीन सुरू करताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या केल्या पाहिजेत, याविषयी माहिती दिली आहे.

५. त्यांनी सांगितलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीनंतर वर्कआऊट किंवा रुटीन सुरू करताना काहीही एकदम टोकाचं करू नका. तुमचा आहार, तुमचा व्यायाम आणि तुमची झोप या तिन्ही गोष्टी नॉर्मल असू द्या.

६. दिवाळीत खूप खाणं झालं म्हणून दिवाळीनंतर एकदम आहार कमी करणं किंवा मग खूपच जास्त व्यायामाला लागणं, यामुळे कमालीचा अशक्तपणा येऊ शकतो आणि त्याचा तब्येतीवर परिणाम होऊ शकतो.

७. त्यामुळे दिवाळीनंतर अगदी सावकाशपणे तुमचं दिवाळीपुर्वीचं रुटीन सुरू करा. ते तब्येतीसाठी अधिक चांगलं असेल, असं ऋजुता सांगतात.