STD Facts : असुरक्षित Sex मुळे होतात धोकादायक आजार, शरीर संबंधांपूर्वी ६ गोष्टी लक्षात ठेवा By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 04:26 PM 2021-07-20T16:26:55+5:30 2021-07-20T17:18:03+5:30
STD Facts : सेक्सुअली ट्रांसमिटेड डिसीजपासून बचाव करण्यासाठी गर्भनिरोधक (कंडोम) हा सुरक्षित उपाय आहे. तरीही या उपायानं १०० टक्के सुरक्षिततेची शाश्वती देता येत नाही. सेक्सुअली ट्रांसमिटेड डिसीज (STDs) हे एक प्रकारचं इंफेक्शन आहे जे शरीरसंबंधांच्या माध्यमातून एका व्यक्तीकडून इतर व्यक्तींपर्यंत पोहोचतं. एका रिपोर्टनुसार २०२० मध्ये भारतात जवळपास ३ कोटींपेक्षा जास्त लोक सेक्सुअली ट्रांसमिटेड डिसिजनं संक्रमित होते. जास्तीत जास्त लोक या आजाराबाबत खुलेपणानं बोलणं टाळतात. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एसटीडीबाबत काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे.
महिलांमध्ये जास्त असतो STD चा धोका महिलांमध्ये सेक्शुअली ट्रांसमिटेड आजार पसरण्याचा धोका जास्त असतो. पुरूषांच्या तुलनेत महिलाचे नाजूक भाग जास्त संवेदनशील असतात. त्यामुळे या प्रकारचे आजार पसरण्याचा धोका जास्त असतो.
या आजारावर वेळीच योग्य उपचार घेणं गरजेचं असतं. कारण यामुळे इतर अनेक गंभीर आजार होण्याचा धोका असतो. महिलांना पेल्विक इंफ्लेमेटरी डिजीजचाही सामना करावा लागू शकतो. आपल्या पार्टनरला गर्भनिरोधक (कंडोम) वापरण्याचा सल्ला देऊन महिला या आजाराचा धोका टाळू शकतात.
एकूण ३५ प्रकारचे STD असतात एकूण ३५ प्रकारचे STD असतात. जास्तीत जास्त लोकांना ह्युमॅन पॅपिलोमावायरस (HPVs) हर्पीज, सिफलिस, हेपेटाइटिस, गोनोरिया, क्लॅमाइडिया आणि ह्यूमन इम्युनो डेफिशिएंसी वायरस (HIV) या आजारांचा सामना करावा लागतो. यातील काही STD यौन संपर्काच्या माध्यमातून न पसरता ब्लड ट्रान्सफ्यूशननं पसरतात.
STD चे वेळीच उपचार केले गेले नाही तर इन्फर्टिलिटीची समस्या येऊ शकते. सेक्सुअली ट्रांसमिटेड डिसिजचे वेळीच उपचार केले गेले नाही तर इनफर्टिलीची समस्या उद्भवू शकते. STD मुळे प्रजनन क्षमता कमी होण्याचा धोका महिलांसह पुरूषांमध्यही जास्त असतो. गोनोरिया आणि क्लॅमायडियाच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये पसरण्यानं महिलांच्या फर्टिलिटीवर याचा परिणाम होतो. त्यामुळे प्रेग्नंसीत अडचणी येतात.
काहीवेळा STD असिम्पटमॅटिक असतात अनेकदा सेक्शुअली ट्रांसमिटेड डिसीज असिम्पोमॅंटिक असतात. त्यामुळे लक्षण नसतानाही इतरांपर्यंत पोहोचू शकतात. काहीवेळा याची लक्षणं दिसून येत नाहीत. हरपीज आणि क्लॅमाइडिया या आजारात लवकर लक्षणं दिसून येत नाहीत.
सेक्सुअली ट्रांसमिटेड डिसीजपासून बचाव करण्यासाठी गर्भनिरोधक (कंडोम) हा सुरक्षित उपाय आहे. तरीही या उपायानं १०० टक्के सुरक्षिततेची शाश्वती देता येत नाही. आजार पसरण्याचा धोका नेहमीच असतो म्हणून प्रोटेक्शनचा वापर करायला हवा.
प्रेग्नंसीदरम्यान सेक्सुअली ट्रांसमिटेड डिसीज उद्भवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानं योग्य उपचार घेऊन आजार बरा करता येऊ शकतो. गंभीर स्थितीत डॉक्टर ऑपरेशनच्या माध्यमातून डिलिव्हरी करण्याचा सल्ला देतात.