आता फक्त ५ सोप्या स्टेप्समध्ये घरच्याघरी करा बॉडी पॉलिशिंग, पार्लरमध्ये जाऊन मिळणार नाही इतका ग्लो ! By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2024 06:28 PM 2024-06-22T18:28:27+5:30 2024-06-22T18:44:33+5:30
How to do body polishing at home : Body Polishing at Home for Radiant Skin : ब्यूटी पार्लर, स्पामध्ये बॉडी पॉलिशिंग केलं जातं. मात्र या महागड्या ट्रिटमेंटवर पैसे खर्च करायचे नसतील तर तुम्ही घरच्या घरी बॉडी पॉलिशिंग करू शकता... बॉडी पॉलिशिंग हा एक प्रकारचा सौंदर्य उपचार आहे. यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहते. या उपायामुळे त्वचेतील मृत पेशी काढून टाकल्या जातात, ज्यामुळे स्किनला चमक येते. याचबरोबर त्वचेत आर्द्रता टिकून राहते आणि त्वचा मऊ व कोमल बनते. सर्वचजण आपल्या चेहऱ्याच्या स्किनची काळजी घेतात. परंतु संपूर्ण शरीराच्या त्वचेची काळजी घेण्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आपल्या शरीराच्या संपूर्ण त्वचेतील डेड स्किन काढून टाकणे गरजेचे असते. यासाठी बॉडी पॉलिशिंग हा उत्तम पर्याय मानला जातो(Step By Step Body Polishing At Home for Bright & Glowing Skin).
स्टेप १ :- १. सगळ्यांत पहिली स्टेप म्हणजे त्वचेला क्लिन करणे. सगळ्यांत आधी कोमट पाण्याने स्वच्छ आंघोळ करुन घ्यावी. असे केल्याने कोमट पाण्यामुळे आपल्या त्वचेची छिद्रे ओपन होतील. यामुळे त्यांना स्वच्छ करणे सोपे जाईल. आंघोळ करण्यापेक्षा जर आपण स्टिम बाथ घेतला तर तो आणखीन फायदेशीर ठरेल.
स्टेप २ :- २. आता खोबरेल तेल घेऊन ते थोडे कोमट गरम करावे. हे कोमट तेल संपूर्ण शरीराला लावून मसाज करुन घ्यावा. यामुळे त्वचा खोलवर हायड्रेट होईल आणि एक्सफोलिएशन दरम्यान नुकसान होण्यापासून संरक्षण केले जाईल. आता तुमची त्वचा पॉलिश म्हणजे एक्सफोलिएशनसाठी तयार आहे.
स्टेप ३ :- ३. बॉडी पॉलिशिंगसाठी आपण होममेड स्क्रबरचा देखील वापर करु शकता. यासाठी एका भांड्यात ६ टेबलस्पून दही घेऊन त्यात प्रत्येकी ४ टेबलस्पून साखर व कॉफी घालावी. आता त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून एलोवेरा जेल, बेसन, २ टेबलस्पून खोबरेल तेल किंवा जोजोबा ऑईल घाला. अशा प्रकारे एक्सफोलिएशनसाठी होममेड स्क्रबर तयार आहे.
स्टेप ४ :- ४. आता स्किन किंचित ओली करुन त्यावर हा तयार स्क्रबर लावून घ्यावा. त्यानंतर ५ मिनिटे हा स्क्रबर असाच स्किनवर सेट होण्यासाठी लावून ठेवावा. हळूहळू हा स्क्रबर सुकू लागेल. आता हळूहळू हलक्या हातांनी मसाज करुन घ्यावा. यामुळे स्किनवरील डेड स्किन निघून आपली स्किन ग्लो करु लागेल.
स्टेप ५ :- ५. त्यानंतर पुन्हा एकदा स्क्रबर संपूर्ण स्किनला लावून घ्यावा आणि तीच स्टेप करून घ्यावी. मसाज करून डेड स्किन काढल्यावर कोमट पाण्याने पुन्हा एकदा आंघोळ करून घ्यावी. आंघोळ करून झाल्यावर स्किनवर ऑईल बेस्ड लोशन किंवा क्रिम लावून हलकेच मसाज करावा. अशा प्रकारे आपली स्किन ब्राइट दिसेल व ग्लो करु लागेल.