1 Gram Gold Mangalsutra : १ ग्रॅम वजनाची पाहा सोन्याची स्टोन पेंडंट मंगळसूत्र; रोज वापरण्यासाठी १० सुंदर डिजाईन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 04:17 PM2024-11-25T16:17:26+5:302024-11-26T16:32:56+5:30

Stone Pendant Mangalsutra : अगदी कमी वजनाचे हे मंगळसूत्र तुम्हाला १ ते २ ग्रॅम सोन्यात सहज मिळतील.

मंगळसुत्र हा सौभाग्याच अलंकार आहे. मंगळसुत्राचे अनेक पॅटर्न्स सोशल मीडियावर दिसतात. अभिनेत्रींपासून सोशल मीडिया स्टार्सपर्यंत सर्वांनाच नाजूक डिजाईन्सचे कानातले आवडतात. (1 Gram Gold New Mangalsutra design)

दोन वाट्या, पानं या मंगळसुत्रांपेक्षा आजकाल पेंडंटमध्ये स्टोन असलेले सिंपल मंगळसुत्र बऱ्याचजणींना आवडतात. (Stone Pendant Mangalsutra)

अगदी कमी वजनाचे हे मंगळसूत्र तुम्हाला १ ते २ ग्रॅम सोन्यात सहज मिळतील.

या मंगळसुत्रांची खासियत अशी की वजन कमी असल्यामुळे कमीत कमी खर्चात उपलब्ध होतात.

यात इन्फिनिटी, हार्ट शेप, राऊंड स्टोन, सर्कल स्टोन, स्वेअर स्टोन, अशा डिजाईन्समध्ये मंगळसुत्राचे पेंडंट मिळेल.

आर्टिफिशल मंगळसुत्रांमध्येही अशा डिजाईन्स उपलब्ध आहेत. जे तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर सहज उपलब्ध होतील.

मंगळसुत्रात छोटं फुलं आणि सिंगल स्टोनचं पेंडंट सुंदर दिसतं.

तुम्हाला जर थोडं जाड सरीचं मंगळसूत्र हवं असेल तर सेम डिजाईनमध्ये तुम्ही ५ ते ७ ग्रॅमचं मंगळसुत्र बनवून घेऊ शकता.

काळ्या मण्यांमध्येही वेगेगळ्या व्हरायटी असतात. तुम्ही आपल्या आवडीनुसार मंगळसुत्रात काळ्या मण्यांची संख्या वाढवू शकता किंवा कमी करू शकता.

या प्रकारचे मंगळसुत्र तुम्ही साडीवर किंवा ड्रेसवरही घालू शकता.