जोडीदारानं आपलं सगळं ऐकावं असं वाटतं? सुधा मुर्ती सांगतात रोज २ गोष्टी करा; वादच होणार नाही By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 11:03 PM 2023-12-25T23:03:01+5:30 2023-12-25T23:18:14+5:30
Sudha Murthy's Relationship advice : लहानपणापासून मुलांना प्रत्येकाचा आदर करा असं शिकवलं जातं. पण लग्नानंतर अनेकांना या गोष्टीचा विसर पडतो आणि दे पार्टनरला आणि पार्टनरच्या म्हणण्याला सन्मान देत नाहीत. लग्न (Marriage) हे सर्वात पवित्र नातं मानलं जातं. लग्नाच्या नात्यात लोक शेवटपर्यंत एकमेकांना साथ देण्याचे वचन देतात. पण आजकाल घटस्फोटांचे प्रमाणही वाढत चालले आहे. वेळीच नात्यातील दुराव्याकडे लक्ष दिले तर तुम्ही नातं तुटण्यापासून वाचवू शकता. प्रसिद्ध मोटिव्हशनल स्पिकर आणि लेखक सुधा मूर्ती यांनी कपल्सना रिलेशनशिप एडव्हाईस दिली आहे. (Sudha Murthy's Relationship advice)
परफेक्ट कपल्स बनण्यासाठी टिप्स कोणतंही नातं टिकवण्यासाठी नात्यात प्रेम असणं फार महत्वाचं असतं. आजकाल लोक पैश्यांना अधिक महत्व देतात. नात्यापेक्षा पैशांना जास्त महत्वाचं समजतात
सुधा मूर्तीनी सांगितले की ज्या लग्नांमध्ये फक्त पैसा पाहून लग्न केलं जातं किंवा पैसा हाच त्या लग्नाचा आधार असतो अशी लग्न जास्त दिवस टिकत नाही. दोन जणांमध्ये प्रेमाचे बॉन्डींग असायला हवं. जे पैशांमुळे असू नये. अन्यथा नाती कमकुवत होत जातात.
एकमेकांचा आदर लहानपणापासून मुलांना प्रत्येकाचा आदर करा असं शिकवलं जातं. पण लग्नानंतर अनेकांना या गोष्टीचा विसर पडतो आणि दे पार्टनरला आणि पार्टनरच्या म्हणण्याला सन्मान देत नाहीत. लग्नानंतर प्रत्येकजण हे सगळं विसरून जातो.
सुधा मूर्ती यांच्यामते लग्नांतर दोघांमध्येही प्रेम आणि सन्मान असायला हवा. तरच नातं टिकू शकता. एकमेकांच्या चांगल्या वाईट वेळेत साध द्यायला हवी. तर तुम्ही परफेफ्ट कपल बनू शकाल.