राखीपौर्णिमेला भावासाठी गोड काय करावं? बघा साखर- कॅलरी कमी असणाऱ्या ५ सुपरहेल्दी मिठाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2024 01:41 PM2024-08-17T13:41:45+5:302024-08-17T13:46:18+5:30

राखीपौर्णिमेला नारळीभाताचे महत्त्व आहे. पण तो करणं अनेकींना अवघड, वेळखाऊ वाटतं. म्हणूनच भावासाठी राखीपौर्णिमेच्या दिवशी काहीतरी वेगळा गोड पदार्थ करायचा असेल पण काय करावं हे सुचत नसेल तर हे काही पर्याय पाहा..

राखीपौर्णिमेच्या दिवशी गोड म्हणून तुम्ही सुकामेवा आणि खजूर घालून लाडू करू शकता. हे लाडू अतिशय पौष्टिक असतात.

दुसरा पदार्थ म्हणजे बदामाचे लाडू. यासाठी बदाम आणि थोडा राजगिरा भाजून घ्या. ते थंड झाले की गूळ घालून एकत्रितपणे मिक्सरमधून बारीक करून घ्या. त्यामध्ये थोडं तूप घालून त्याचे लाडू वळा. अतिशय चवदार होतात.

तिसरा पदार्थ म्हणजे दूध आटवून घ्या. त्यामध्ये काजू, बदाम पावडर टाका आणि अगदी कमी म्हणजेच थोडासा गोडवा येईल, एवढीच साखर घाला. छान बासुंदी तयार..

तुम्ही बहिण- भाऊ दोघेही वजन आणि तब्येतीच्या बाबतीत खूप काटेकोर असाल तर ओट्सची खीर तुमच्यासाठी एक चांगला पदार्थ ठरू शकतो. या खिरीमध्ये गोडवा येण्यासाठी केळ, खजूर असे पदार्थ टाका.

राजगिऱ्याची खीरदेखील तुम्ही करू शकता. हा देखील एक वेगळा पदार्थ ठरेल. यामध्ये भरपूर ड्रायफ्रूट्स, केशर, वेलची घाला. तसेच गोडव्यासाठी गूळ घाला. एकदम चवदार आणि हेल्दी मिठाई तयार.