डेली युजसाठी सुई धागा पॅटर्नचे नाजूक कानातले; पाहा १० आकर्षक डिजाईन्स-उठून दिसेल चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 01:08 PM2024-02-28T13:08:21+5:302024-02-28T13:51:36+5:30

Sui Dhaga Earrings Designs : कमीत कमी ग्रॅममध्ये तुम्हाला या कानातल्यांच्या आकर्षक डिजाईन्स बनवता येतील.

कानातले नसले की चेहरा आकर्षक दिसत नाही. (Sui Dhaga Gold Earrings For Women) तुम्ही आपल्या आवडीनुसार कानातल्यांची निवड करू शकता. पण रोजच्या वापरासाठी सुई-धागा पॅटर्नचे कानातले शोभून दिसतात. या कानातल्यांचा सेट नाजूक किंवा हेवी असू शकतो. (Gold Sui Dhaga Earrings)

कमीत कमी ग्रॅममध्ये तुम्हाला या कानातल्यांच्या आकर्षक डिजाईन्स बनवता येतील. हे घातल्यानंतर चांगला लूक येईल आणि डिजाईनसही सिंपल असेल.

सुई-धागा पॅटर्न हे थोडं झुमक्यांप्रमाणे दिसते. घरात किंवा इतर कुठेही तुम्ही या प्रकारचे दागिने वापरू शकता.

साडी, कुर्ता किंवा पंजाबी सुटवर तुम्ही अशा टाईपचे कानातले वापरू शकता. हे कानातले अत्यंत कमी वजनातही उपलब्ध होतात.

कानातल्यांचे आकर्षक पॅटर्न्स तुम्हाला ऑनलाईन किंवा ज्वेलरी शॉपमध्येही उपलब्ध होतील.

या कानातल्यांमुळे चेहरा नेहमीपेक्षा वेगळा दिसतो आणि अधिकच खुललेला दिसतो.

तुम्हाला याच पॅटर्नमध्ये थोडी जाड डिजाईन हवी असेल तर तुम्ही कोणत्याही या प्रकारचे कानातले ट्राय करू शकता.

फुलांंच्या डिजाईन्समध्ये तुम्ही कलरफूल ऑपश्न बघू शकता.

कानातल्यांच्या स्टोनमध्ये वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला उपलब्ध होतील.

आर्टिफिशियल सुई धागा कानातले तुम्हाला १०० रूपयांपासून ५०० रूपयांपर्यंत सहज मिळतील.