उन्हाळ्यात तुमच्याकडे हव्यातच ‘या’ ५ पँट्स, ट्रेंडी बॉटम वेअरचे लेटेस्ट प्रकार, घामाचा त्रासही होणार नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2025 17:16 IST2025-04-09T17:11:58+5:302025-04-09T17:16:19+5:30
summer bottom wear trends 2025: jeans alternatives for summer: how to dress professional in summer: best bottoms to wear in hot weather: आपल्यालाही उन्हाळ्यात हलके आणि आरामदायी कपडे घालायचे असेल तर ट्रेंडी बॉटम वेअरचे लेटेस्ट पर्याय पाहू शकतो.

उन्हाळ्यात वातावरणात बदल होतो. ज्यामुळे तापमान वाढते. यामुळे आपल्याला अधिक गरम होते. शरीरातून घामाच्या धारा वाहू लागतात. यामुळे आपल्या जाड आणि उबदार कपडे नकोसे वाटतात. अशावेळी आपल्याला हलके-फुलके कॉटनचे कपडे घालण्याची इच्छा होते. (summer fashion for women without jeans)
उन्हाळ्यात जीन्स किंवा टाईट कपडे घालण्याचा वैताग येतो. घामामुळे शरीराची दुर्गंधी येते. जीन्सच्या वापरामुळे मांड्यांना रॅशेस येतात, चालताना त्रास होतो. जर आपल्यालाही उन्हाळ्यात हलके आणि आरामदायी कपडे घालायचे असेल तर ट्रेंडी बॉटम वेअरचे लेटेस्ट पर्याय पाहू शकतो. (cool and classy summer outfits)
उन्हाळ्यात कॉटन पलाझोचा बॉटम वेअर सगळ्यात चांगला पर्याय आहे. यामुळे आपल्याला अधिक प्रमाणात गरम होत नाही. यामध्ये आपण प्रिंटेड, स्ट्राइप्स किंवा सॉलिड कलर्सची निवड करु शकतो. (trendy bottom wear for office women)
लिनेन ही हलकी आणि आरामदायी पॅन्ट आहे. या पॅन्टमध्ये आपण अधिक उंच दिसतो. सरळ कटमध्ये असल्याने ही पॅन्ट ऑफिस वेअरपासून ते कॅज्युअल आउटिंगसाठी घालता येते. या पॅन्ट्समध्ये पांढरा, बेज किंवा पेस्टल शेड्स चांगले वाटतात.
फ्लोई स्कर्ट्स हा चांगला पर्याय आहे. यामध्ये आपण सुपरकूल दिसतो. क्रॉप टॉप किंवा साध्या टी-शर्टने स्टाइल करु शकता.
घरी किंवा बीच साइडला जायचे असेल तर कॉर्टन शॉर्ट्सपेक्षा चांगला पर्याय नाही. हे घालण्यासाठी अतिशय हलके-फुलके कपडे आहेत. यामध्ये आपण अनेक रंग आणि डिझाइन्सची निवड करु शकतो.
क्युलोट्स हा बॉटम वेअरचा प्रकार आहे. जे खूप घट्ट किंवा सैल नसते. हे आपल्याला कॅज्युअल वेअर म्हणूनही घालता येते. हे पॅन्टसारखे दिसत असले तरी स्कर्ट्सारखे असते.