उन्हाळ्यात घालण्यासाठी पाहा परफेक्ट शॉर्ट कुर्ती; जीन्स पलाझोवर दिसतील सुंदर, गरमही होणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2025 17:07 IST2025-04-06T17:05:28+5:302025-04-06T17:07:29+5:30
Summer short kurti fashion: Trendy short kurtis for women: Short kurti with jeans style: Short kurti with palazzo pants: Comfortable summer outfits for women: ऑफिस असो किंवा कॉलेज आपल्याला तेच तेच कपडे घालून कंटाळा येतो. अशा वेळी जीन्स किंवा पलाझोवर काही नवीन ट्रेंडी कुर्ती वापरु शकतो.

उन्हाळा सुरु झाला की, आपण हलके आरामदायी कपड्यांची निवड करतो. ज्यामुळे आपल्याला जास्त गरम होणार नाही. परंतु अनेकदा जास्त जड किंवा कॉटनचे कपडे नसतील तर घामाच्या धारा लागतात. (Summer short kurti fashion)
ऑफिस असो किंवा कॉलेज आपल्याला तेच तेच कपडे घालून कंटाळा येतो. अशा वेळी जीन्स किंवा पलाझोवर काही नवीन ट्रेंडी कुर्ती वापरु शकतो. (Comfortable summer outfits for women)
कळीदार पॅटर्नमध्ये असलेली ही कुर्ती आपण जीन्स, ट्राउझर्स किंवा कार्गोसोबत घालू शकतो. यामध्ये व्ही नेकलाईन आहे. लांब कानातल्या ऐवजी आपल्याला त्यावर ब्रेसलेट घालता येईल.
पलाझोसोबत जाड बॉर्डर असलेली व्ही नेक शॉर्ट कुर्ती घालता येईल. हे फॉर्मल आणि स्टायलिश दिसेल.
बॉसी आणि फंकी फॅशनसाठी कॉलर स्टाईल व्ही नेक कुर्ती हा पर्याय चांगला आहे. यामध्ये आपल्याला फुल आणि क्वार्टर स्लीव्हजमध्ये सहज मिळेल.
प्रिटेंड शॉर्ट कुर्ती फॅशन आणि बजेटमध्ये अगदी योग्य बसते. ही कुर्ती आपल्याला जीन्स सोबत वापरता येते. यावर ऑक्सिडाइडचे कानातले छान दिसतात.
ऑफिसमध्ये डार्क कलर वापरण्याऐवजी आपण लाईट रंग वापरू शकतो. यात फॉर्मल फॅशनमध्ये साधी व्ही नेक शॉर्ट कुर्ती निवडा.