भाऊबीज स्पेशल : लाडक्या भावासाठी 'स्वीट डिश' काय करायची? ५ सोपे झटपट पर्याय, करा स्पेशल बेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2023 11:17 AM2023-11-14T11:17:57+5:302023-11-14T11:20:02+5:30

भाऊबीजेला भाऊ घरी येणार असल्यावर त्याच्यासाठी काहीतरी मस्त जेवणाचा बेत आपण करतोच. पण गाेड काय करावं हा प्रश्न पडतो. कारण या दिवसांत खूप गोड खाणं झालेलं असतं.

त्यामुळे गोड पदार्थाचा कंटाळा येणार नाही आणि तो पदार्थ मनापासून खावा वाटेल, असं काहीतरी भावासाठी करावं वाटतं. पण ते नेमकं काय असावं, असा प्रश्न पडतो. म्हणून तेच तर आता पाहूया की भावासाठी झटपट आणि कमी मेहनतीत होऊ शकणारे कोणते गोड पदार्थ करता येतील...

यातला सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे घट्ट दूध आटवून केलेली रबडी. दूध उकळायला ठेवलं आणि भरपूर उकळू दिलं की झाली रबडी तयार. त्यात भरपूर सुकामेवा घाला आणि साखर थोडी बेताची टाका. भाऊ आवडीने खाईल.

दुसरा गोड पदार्थ आहे फ्रुट सलाड. हा पदार्थही एकदम वेगळा आहे. त्यामुळे कितीही गोड खाणं झालं असलं तरी बहुतांश लोक तो आवडीने खातात.

फ्रुट सलाडसारखाच पदार्थ आहे फ्रुट कस्टर्ड. हा पदार्थही आवडीने खाल्ला जातो. शिवाय तो करायला खूप मेहनतही लागत नाही

चौथा पदार्थ आहे मखानाची खीर. मखाना तुपात परतून घ्या. दूध थोडं आटवून घ्या. परतून घेतलेले अर्धे मखाना आणि बदाम मिक्सरमधून फिरवून त्याची पावडर करून घ्या. परतलेले मखाना, मखाना पावडर दुधात टाकून उकळलं आणि बेताची साखर टाकली की पौष्टिक अशी मखाना खीर झाली तयार.

केक करण्यात एक्सपर्ट असाल तर भावासाठी छानसा त्याच्या आवडीच्या फ्लेवरचा केक करा...कितीही गोड खाल्लेलं असलं तरी केक खाण्याचा कंटाळाही कधीच येत नाही.