लग्न- समारंभात गळ्यात हवाच असा ठसठशीत मोत्याचा दागिना, बघा तन्मणीचे ८ मनमोहक डिझाईन्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2024 03:49 PM2024-03-30T15:49:21+5:302024-03-30T15:55:18+5:30

चिंचपेटी आणि तन्मणी हे दोन मोत्याचे पारंपरिक मराठमोळे दागिने. यापैकी एकच दागिना गळ्यात असेल तरी तो ठसठशीत दिसतो.

लग्नसराईनिमित्त तन्मणी घ्यायचा असेल तर हे बघा तन्मणीचे काही लेटेस्ट, फॅशनेबल प्रकार. हा तन्मणीचा प्रकार अतिशय वेगळा आहे.

लहान मुलींसाठी खरेदी करायची असेल तर असा तीन खड्यांचा तन्मणी छान दिसेल.

तन्मणी ३, ५ आणि ७ खड्यांचे असतात. भरगच्च दागिन्यांची आवड असेल तर असा ७ खड्यांचा तन्मणी तुम्हाला आवडू शकतो.

ऑक्सिडाईज दागिन्यांची क्रेझ अजूनही आहेच. त्यामुळे असा ऑक्सिडाईज प्रकारातला तन्मणी तुम्ही घेऊ शकता.

तन्मणीचं पेंडंट असलेलं असं मंगळसूत्रही तुम्ही घेऊ शकता.

तन्मणी पेंडंट मंगळसूत्रात असणारा हा एक प्रकारही बराच ट्रेण्डिंग आहे. साडी नेसून थोडा मॉडर्न, स्टायलिश लूक करायचा असेल तर हे गळ्यातलं छान वाटेल.

साडीच्या रंगानुसार असा एखादा तन्मणीही तुम्ही घेऊ शकता.

तन्मणी हा टिपिकल मोत्यांचा दागिना म्हणून ओळखला जाते. पण हल्ली अशा प्रकारचेही तन्मणी मिळतात.

तन्मणीचा हा प्रकारही एकदम लेटेस्ट आहे. लग्नकार्यात हा छान शोभून दिसतो.