ठुशी मंगळसूत्राचे १० देखणे डिझाइन्स, ठुशी नेहमीच घालता आता ठुशीचे मंगळसूत्र ट्राय करा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2025 17:50 IST2025-04-21T16:38:08+5:302025-04-22T17:50:02+5:30

ठुशी हा अस्सल मराठी दागिना अगदी लहान मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यंत प्रत्येकीच्याच गळ्यात शोभून दिसतो. आता त्याच ठुशी डिझाईन्सचे असे कित्येक नवनविन मंगळसूत्र पाहायला मिळतात.(thushi mangalsutra patterns)
अशा पद्धतीचं मंंगळसूत्र काही दिवसांपुर्वी खूप ट्रेडिंग होतं आणि आतासुद्धा त्याची क्रेझ आहेच..(latest fashion thushi mangalsutra designs)
हे एक सुंदर डिझाईन पाहा.. हे डिझाईन तुम्ही सोन्यातही कमी वजनात घडवून घेऊ शकता.(thushi mangalsutra for wedding season)
ठुशीच्या पदकाखाली थोडेसे काळे मणी लावून तयार केलेलं हे मंगळसूत्रही अतिशय देखणं दिसतं.
ठुशीचं पदक आणि त्याला माळा मात्र काळ्या आणि सोनेरी मण्यांच्या... हे डिझाईनही गळ्यात खूप छान दिसतं. त्याच्या जोडीला इतर कोणता दागिना गळ्यात नाही घातला तरी चालतो.
सणावाराला किंवा घरगुती समारंभांसाठी अशा पद्धतीचं ठसठशीत ठुशी मंगळसूत्र गळ्यात शोभून दिसतं.
ठुशी मंगळसूत्राचा हा एक अतिशय नविन प्रकार पाहा.. हा प्रकार पाहताक्षणीच कोणालाही आवडणारा आहे.
असं ठुशी मंगळसूत्र आणि त्यावरचे नाजुक कानातले.. येत्या अक्षय्य तृतीयेला असा काही वेगळा दागिना नक्की घेऊन पाहा..
ठुशी मंगळसूत्राचा हा आणखी एक सुंदर आकर्षक प्रकार..
ऑक्सिडाईज किंवा चांदीमध्येही तुम्हाला ठुशी मंगळसूत्र मिळू शकतात.